Girija Oak : ...अन् धावत्या लोकलमध्ये तृतीयपंथीयाने धरले गिरीजा ओकचे पाय, पण का?

Last Updated:
Girija Oak Mumbai Local Incident : अभिनेत्री गिरीजा ओकनं मुंबई लोकलमधील एक प्रसंग शेअर केला. धावत्या लोकलमध्ये एका तृतीयपंथीयाने तिचे पाय धरले होते. नेमकं काय झालं होतं?
1/7
अभिनेत्री गिरीजा ओक तिच्या ब्लू साडीतील फोटो सोशल मीडियावर ट्रेंडमध्ये आहेत. गिरीजा ओकच्या साळेपणाने देशभरातील लोकांची मनं जिंकली. ती रातोरात नॅशनल क्रश बनली.  गिरीजाने या सगळ्याचा आनंद व्यक्त केला पण AI चा वापर करून केल्या जाणाऱ्या गोष्टींबाबत तिनं भीती व्यक्त केली.

advertisement
2/7
गिरीजा ओक गेली अनेक वर्षा मराठी तसेच हिंदी सिनेसृष्टीत काम करतेय. सिनेमा, नाटक, जाहिरात विश्वात तिनं मोठं नाव कमावलं. गिरीजाने नुकत्याच एका मुलाखतीत तिच्या आयुष्यातील अनेक महत्त्वाचे प्रसंग आणि किस्से सांगितले.

3/7
धावत्या ट्रेनमध्ये एका तृतीयपंथीयाने गिरीजाचे पाय धरले होते. लल्लनटॉपला दिलेल्या मुलाखतीत बोलताना गिरीजाने हा किस्सा सांगितला. ती म्हणाली,
धावत्या ट्रेनमध्ये एका तृतीयपंथीयाने गिरीजाचे पाय धरले होते. लल्लनटॉपला दिलेल्या मुलाखतीत बोलताना गिरीजाने हा किस्सा सांगितला. ती म्हणाली, "गर्दीच्या वेळेस ट्रेन पकडत होते. आतमध्ये चढायला जागा नव्हती. मी स्वत: बाहेर लटकले होते पण त्या पोलला पकडून उभी होती."
advertisement
4/7
"ट्रेन सुरू झाली तोच एक थर्ड जेंडर ट्रेनमध्ये चढला. तो चढताच सगळ्यांच्या रिअँक्शन बदलल्या. आता यांना चिकटून उभं राहावं लागणार... तो चढला आणि त्याला पकड्यासाठी काही नव्हतं. मला वाटलं की तो पडेल. मला कळलं नाही, मी त्याच्या बाजूला उभी होती मी त्याला हाताने पडकलं जेणेकरून तो पडू नये, नाहीतर तो त्यावेळेस पडलाच असता."
advertisement
5/7
गिरीजा पुढे म्हणाली,
गिरीजा पुढे म्हणाली, "पुढचं स्टेशन येई पर्यंत त्या गर्दीत आम्ही तसेच उभे होतो. गर्दी थोडी कमी झाली, पुढचं स्टेशन आलं तोपर्यंत मी त्याला कंबरेत धरून तशीच उभी होते."
advertisement
6/7
 "तिसरं स्टेशन गेलं, गर्दी कमी झाली आणि त्याने माझे पाय पकडले. तो मला म्हणाला की, मी बाजूने जरी गेलो तरी लोक बाजूला होतात आणि तुम्ही मला पकडून ठेवलं. तुम्ही मला हात लावू शकता त्या योग्यतेचा मी आहे असं तुम्हाला वाटलं ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे."

7/7
 "मला इतकं वाईट वाटलं की, आपण इतके असहनशील कसे असू शकतो. हे खूप सॅड आहे. हे लोक रस्त्यावर का असतात, हे लोक काम का करत नाही, असे प्रश्न विचारतात. कोण देतं या लोकांना काम. त्यांचा खरंच प्रोब्लेम आहे", असंही गिरीजानं सांगितलं.

Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement