ही सायकोलॉजिकल थ्रिलर फिल्म, मेंदूला झिणझिण्या येणारा क्लायमॅक्स, हा सीन पाहून बसेल 440 व्होल्टचा धक्का
- Published by:Manjiri Pokharkar
Last Updated:
OTT Psycho Thriller Movie : ओटीटीवरील एका सायकोलॉजिकल थ्रिलर फिल्मचा क्लायमॅक्स मेंदूला झिणझिण्या येणारा आहे.
advertisement
advertisement
जर तुम्हीही अशा चित्रपटांचे चाहते असाल, तर आज आम्ही तुम्हाला अशा एका सायकोलॉजिकल थ्रिलरबद्दल सांगणार आहोत, ज्यातील प्रत्येक सीन सस्पेन्स आणि रोमांचाने परिपूर्ण आहे आणि क्लायमॅक्स तर इतका भन्नाट आणि अनपेक्षित आहे की पाहून जणू 440 व्होल्टचा धक्का बसतो. 'रत्सासन' असं या चित्रपटाचं नाव आहे. 2018 मध्ये हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला होता.
advertisement
सस्पेन्स आणि थराराने भरलेल्या चित्रपटांचे प्रेक्षक गेल्या काही वर्षांत झपाट्याने वाढले आहेत आणि म्हणूनच या प्रकारचे चित्रपटही भरपूर प्रमाणात बनत आहेत. ओटीटीवर अनेक सस्पेन्स-थ्रिलर चित्रपट आहेत, ज्यांची कथा पाहताच मन त्यात हरवून जाते. त्यातही ‘रत्सासन’ ही एक अशी सायकोलॉजिकल थ्रिलर आहे, ज्यातील प्रत्येक सीन रोमांचक आहे आणि क्लायमॅक्स तर थक्क करणारा आहे. हा चित्रपट 2018 मध्ये रिलीज झाला होता.
advertisement
'रत्सासन' हा सायकोलॉजिकल थ्रिलर 2018 मध्ये थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. चित्रपटाची कथा शाळकरी मुलींच्या हत्या आणि त्याच्या तपासावर आधारित आहे. ‘रत्सासन’च्या प्रचंड यशानंतर याचे अनेक रिमेक्स बनले. पण 7 वर्षांनंतरही मूळ चित्रपटाची बरोबरी कोणी करू शकलेले नाही. याची साक्ष त्याची IMDb रेटिंग देते. या सायकोलॉजिकल थ्रिलरला IMDb वर 8.3 रेटिंग मिळाली आहे. जिओ हॉटस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मवर तुम्हाला हा चित्रपट पाहता येईल.
advertisement
'रत्सासन' या चित्रपटात तमिळ चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता विष्णु विशाल मुख्य भूमिकेत आहे. विष्णु विशाल सध्या आपल्या नव्या 'आर्यन' या चित्रपटामुळे चर्चेत आहे. पण त्याला खरी ओळख आणि लोकप्रियता ‘रत्सासन’मुळे मिळाली आहे. विष्णु विशालसह या चित्रपटात अमाला पॉल, अम्मू अभिरामी, घिबरन आणि काली वेंकट हे कलाकार मुख्य भूमिकेत आहेत.
advertisement
विष्णु विशाल अभिनीत 'रत्सासन' या सायकोलॉजिकल थ्रिलरची सुरुवात दोन वृद्धांपासून होते. ज्यांना 15 वर्षांच्या संयुक्ता नावाच्या मुलीचा मृतदेह सापडतो. याच दरम्यान एन्ट्री होते मनोरुग्णांवर चित्रपट बनवण्याची इच्छा असलेल्या पण कुटुंबाच्या दडपणाखाली पोलीस सब-इन्स्पेक्टर बनलेल्या अरुणची. अरुण आपली बहिण कोकिला, डॉस आणि भाची अम्मूसोबत राहायला लागतो. तेव्हाच कथेत अमुधा नावाच्या मुलीची एन्ट्री होते. जी अचानक गायब होते. अरुण तिच्या केसची चौकशी करतो आणि त्याचा धागा संयुक्ताच्या केसशी जोडला जातो. कथा पुढे जात असताना चित्रपटात एक असा ट्विस्ट येतो जो अत्यंत भयानक आणि अंगावर शहारे आणणारा आहे. चित्रपटातील हा सीन पाहून तुम्हाला 440 व्होल्टचा धक्का बसेल.


