OTT Releases This Week : ओटीटीवर आठवडाभर मनोरंजनाचा महाडोज, रिलीज होतायत या 7 जबरदस्त फिल्म आणि सीरिज

Last Updated:
OTT Releases This Week : ओटीटीवर 8 ते 14 डिसेंबरदरम्यान अनेक जबरदस्त फिल्म आणि सीरिज रिलीज होणार आहेत. नेटफ्लिक्स, प्राईम व्हिडीओ, सोनी लिव आणि जिओ हॉटस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रेक्षकांना या फिल्म आणि सीरिज पाहता येतील.
1/7
 रिअल कश्मीर फुटबॉल क्लब (Real Kashmir Football Club) : 'रिअल कश्मीर फुटबॉल क्लब' ही एका प्रेरणादायी सत्य घटनेवर आधारित स्पोर्ट्स सीरिज आहे. एक हिंदू पंडित आणि एक मुस्लिम अशा काश्मीरमधील दोन व्यक्तींवर आधारित ही सीरिज आहे. 9 डिसेंबरपासून प्रेक्षकांना ही सीरिज Sony Liv वर पाहता येईल.

advertisement
2/7
 साली मोहब्बत (Saali Mohabbat) : 'साली मोहब्बत' ही सस्पेन्स थ्रिलर फिल्म स्मिता या पात्राभोवती फिरणारी आहे. राधिका आपटे या फिल्मध्ये महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. पती आणि चुलतभावाच्या खुनानंतर स्मिताचं आयुष्य कोलमडून जातं अशी या चित्रपटाची कथा आहे. दिव्येंदू शर्मा या फिल्ममध्ये पोलिस अधिकारी रतनच्या भूमिकेत आहे. 12 डिसेंबरपासून ही सीरिज प्रेक्षकांना Zee5 वर पाहता येईल.

3/7
 द ग्रेट शम्सुद्दीन फॅमिली (The Great Shamsuddin Family) : 'द ग्रेट शम्सुद्दीन फॅमिली' ही फिल्म 12 डिसेंबरला Jio Hotstar वर रिलीज होत आहे. चित्रपटाची कथा दिल्लीतील एका धावपळीच्या दिवसाभोवती फिरते. ‘द ग्रेट शम्सुद्दीन फॅमिली’ ही कहाणी बानी अहमद (कृतिका कामरा) हिच्याभोवती फिरते. जिला परदेशातील नोकरीसाठी एक महत्त्वाचे अॅप्लिकेशन भरायचे असते. पण तिची मोठी आणि भावनिकदृष्ट्या गुंतागुंतीची फॅमिली अचानक तिच्या घरी पोहोचल्याने तिचे सारे प्लॅन बिघडतात. सूर्य मावळण्यापूर्वी निर्णय घेण्याच्या प्रयत्नात बानीला प्रत्येक टप्प्यावर अडथळे येतात. कधी वैयक्तिक समस्या तर कधी जुने नातं मध्ये येतं.

4/7
 सिंगल पापा (Single Papa) : नेटफ्लिक्सवर 12 डिसेंबरला रिलीज होणाऱ्या 'सिंगल पापा' या सीरिजमध्ये 30 वर्षांच्या गौरव गहलोत (कुणाल खेमू) याची गोष्ट सांगण्यात आली आहे. जो अजूनही अनेक गोष्टींसाठी आपल्या पालकांवर अवलंबून असतो. अलीकडेच झालेल्या घटस्फोटानंतर अचानक तो एक मूल दत्तक घेण्याचा निर्णय जाहीर करतो. त्याच्या या निर्णयाने त्याच्या कुटुंबियांना मोठा धक्का बसतो. ही सीरिज गौरवचा एक चांगला पिता बनण्याच्या प्रयत्नांची, कौटुंबिक दबावाला तोंड देण्याची गोष्ट सांगणारी आहे. हलका-फुलका विनोद आणि भावनिक स्वरुपातातील ही सीरिज आहे.

5/7
 केसरिया (Kesariya): 'केसरिया' या जबरदस्त डॉक्यूमेंट्री सीरिजमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा (RSS) 100 वर्षांचा प्रवास दाखवण्यात आला आहे. 1925 मध्ये डॉ. केशव बळिराम हेडगेवार यांनी स्थापनेपासून ते आजपर्यंत समाजसेवा, शिक्षण आणि आपत्ती व्यवस्थापनातील संघाच्या भूमिकेपर्यंतचा विकास यात दाखवला आहे. 12 डिसेंबरपासून ही डॉक्यू सीरिज प्रेक्षकांना Zee5 वर पाहता येईल.

6/7
 सुपरमॅन (Superman) : 'सुपरमॅन' ही फिल्म नव्या अवतारात पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी सज्ज आहे. 11 डिसेंबरला ही सीरिज जिओ हॉटस्टारवर रिलीज होत आहे.

7/7
 कांथा (Kaantha) : साऊथ सुपरस्टार दुलकर सलमान 'कांथा' या चित्रपटाच्या माध्यमातून ओटीटीवर प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यास सज्ज आहे. 12 डिसेंबररला त्याचा 'कांथा' हा चित्रपट नेटफ्लिक्सवर रिलीज होत आहे.

Maharashtra Winter Session: भाजपच्या गुगलीने मविआची विकेट पडणार? विरोधी पक्षनेते पदासाठी दोन सरप्राइजिंग नावं
भाजपच्या गुगलीने मविआची विकेट? विरोधी पक्षनेते पदासाठी दोन सरप्राइजिंग नावं
  • भाजपच्या गुगलीने मविआची विकेट? विरोधी पक्षनेते पदासाठी दोन सरप्राइजिंग नावं

View All
advertisement