बॉक्स ऑफिसवर फ्लॉप, OTT वर सुपरहिट! 2 तास 28 मिनिटांचा हा सिनेमा पाहाच, 33 सेकंदांच्या या सीनची होतेय चर्चा
- Published by:Manjiri Pokharkar
Last Updated:
Flop Film Superhit on OTT :
बॉक्स ऑफिसवर दरवर्षी अनेक चित्रपट प्रदर्शित होतात. पण सर्वच चित्रपट निर्माते आणि प्रेक्षकांच्या अपेक्षा पूर्ण करत नाहीत. यंदाही अनेक चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित झाले आहेत. पण त्यातील काहीच हिट ठरले आहेत. पण बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरलेला एक चित्रपट OTT वर मात्र रिलीज होताच सुपरहिट ठरला. OTT प्रेक्षकांकडून या चित्रपटाला भरपूर प्रेम मिळत आहे. या चित्रपटाची कथा मनाला भिडणारी आहे.
advertisement
ओटीटीवर रिलीज झालेला हा चित्रपट पाहिल्यानंतर मनात एकच विचार येतो आजकाल अशा चित्रपटांची निर्मिती कोण करतं? कारण आजकाल लोकांना इंटिमेट सीन, तोडफोड करणारा अॅक्शन, सस्पेन्स, थ्रिलर अशा प्रकारच्या फिल्म्सच आवडतात. ज्यामध्ये हा चित्रपट कुठेच बसत नाही. पण या चित्रपटाची कथा थेट मनाला स्पर्श करणारी आहे. या चित्रपटाची गोष्ट बाप आणि मुलाच्या त्यांच्या स्वप्नांभोवती, साध्या आयुष्याभोवती आणि गावातील एका छोट्या दुकानाभोवती फिरते.
advertisement
advertisement
ओटीटीवर रिलीज झालेल्या चित्रपटाच्या कथेनं लोकांची मनं जिंकली आहेत. नात्यांची खोली, संघर्ष आणि कुटुंबाचं महत्त्व यांना अत्यंत सुंदररीत्या दाखवण्यात आलं आहे. एका मुलाने आपल्या वडिलांच्या स्वप्नांना पूर्ण करण्याचा संकल्प घेतला आहे, आणि एका आईची माया तसेच जुनं प्रेम पुन्हा आयुष्यात परत आणण्याची भावनिक कथा यात मांडलेली आहे.
advertisement
‘इडली कढई’ असं या चित्रपटाचं नाव आहे. धनुषने या चित्रपटाची स्क्रिप्ट लिहिली आणि दिग्दर्शित केली आहे. बॉक्स ऑफिसवर मात्र हा चित्रपट अपयशी ठरला. या चित्रपटाची कथा गावात राहणाऱ्या मुरुगन नावाच्या तरुणाची आहे, जो आपल्या वडिलांचं इडलीचं दुकान सोडून शहरात आणि नंतर दुबईला निघून जातो. पण वडिलांच्या निधनानंतर तो पुन्हा गावात परत येऊन त्यांच्या दुकानाला नव्याने सुरू करण्याचा निर्णय घेतो. हा चित्रपट एका अतिशय भावनिक प्रवासाचं सुंदर चित्रण करतो.
advertisement
‘इडली कढई’ या चित्रपटात धनुष मुख्य भूमिकेत दिसत आहे आणि त्याच्या सोबत नित्या मेनन, अरुण विजय, शालिनी पांडे, सत्यराज, राजकिरण, समुथिरकानी आणि आर. पार्थिबन यांसारखे उत्कृष्ट कलाकार देखील झळकत आहेत. चित्रपटात एक भावनिक दृश्य आहे. जिथे मुरुगनची गायची वासरं नेहमी त्याच्यापासून दूर पळतात आणि मुरुगनची आई त्या वासराला त्याच्या वडिलांचा पुनर्जन्म मानते. एका दिवशी मुरुगन आपल्या वडिलांना स्वप्नात पाहतो आणि धडधडीतपणे जागा होतो, तेव्हा तो वासरू त्याच्या समोर उभं असतं आणि येऊन त्याच्या गळ्याशी अलगद बिलगून राहतं.
advertisement
हा सीन पाहिल्यानंतर तुमच्या डोळ्यांत नक्कीच पाणी येईल. सध्या हा सीन सोशल मीडियावर प्रचंड लोकप्रिय झाला आहे. जरी चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर मिश्र प्रतिक्रिया मिळाल्या असल्या, तरी IMDb वर त्याला 6.8/10 अशी रेटिंग मिळाली आहे. सुमारे 100 कोटींच्या बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटाने भारतात 50.42 कोटी आणि वर्ल्डवाइड 71.77 कोटी रुपयांची कमाई केली. तरीदेखील, या चित्रपटाच्या सिनेमॅटोग्राफी आणि धनुष यांच्या अभिनयाचे प्रचंड कौतुक झाले. काही काळापूर्वी हा चित्रपट Netflix वर प्रदर्शित झाला असून सध्या तो टॉप 10 ट्रेंडिंग फिल्म्समध्ये झळकत आहे.


