लग्नाआधी प्राजक्ताने सांगितली एक गोष्ट, शंभुराजनं घेतली खूपच मनावर; पाहून सासरचेही झाले शॉक
- Published by:Minal Gurav
Last Updated:
Prajakta Gaikwad - Shambhuraj Khutwad : अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड हिनं लग्नासाठी शंभुराजला असं काय सांगितलं जे त्याने खूपच मनावर घेतलं. त्याने असं काही केलं की सगळेच शॉक झाले.
advertisement
advertisement
advertisement
नवऱ्यामधल्या अशा कोणत्या रोमँटीक गोष्टी आहेत ज्या तुझ्या अहोंनी तुझ्यासाठी केल्या आहेत आणि ज्या तुला वाटल्या की या खूपच भारी आहेत, असा प्रश्न प्राजक्ताला एका मुलाखतीत विचारण्यात आला. उत्तर देत प्राजक्ता म्हणाली, खूप गोष्टी आहेत. नक्की कोणती सांगू. ते मला विचारायला माझ्या घरी आले होते तेव्हा मला अजिबात वाटलं नव्हतं की ते येतील."
advertisement
advertisement
प्राजक्ता पुढे म्हणाला, "दुसऱ्या दिवशी ते पंढरपूरला गेले आणि त्यांनी गळ्यात तुळशीची माळ घातली. तेव्हापासून त्यांनी नॉनव्हेज पूर्णपणे सोडलं. 365 दिवस दिवसांतून 3-3 दिवस नॉनव्हेज खाणारा मुलगा जर माझ्यासाठी नॉनव्हेज सोडतोय तर ती माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट होती. आम्ही दोघेही आता प्युअर व्हेजिटेरियन आहोत."
advertisement
प्राजक्ता आणि शंभुराज यांची भेट रस्त्यात अपघाती झाली होती. शुंभराज यांचा ट्रक प्राजक्ताच्या गाडीसमोर आला. प्राजक्ता घाईत शूटला निघाली होती. रस्त्यात गाडी थांबल्यानं प्राजक्ता रागात ट्रक मालकाशी भांडायला गेली. तो ट्रक मालक शंभुराज होता. तिथेच दोघांची पहिली भेट झाली आणि पहिल्या भेटीत शंभुराज प्राजक्ताच्या प्रेमात पडला. नंतर शंभुराजने घरी येऊन प्राजक्ताला लग्नाची मागणी घातली.


