Pranit More : 'तू काळा आहेस, इंग्लिशही येत नाही', लोक हिणवायचे, प्रणित मोरेनं सांगितला बालपणीचा कटू अनुभव
- Published by:Minal Gurav
Last Updated:
Pranit More : कॉमेडियन प्रणित मोरेनं त्याच्या बालपणीचा कटू अनुभव सर्वांबरोबर शेअर केला. त्याची आजवर कधीच समोर न आलेली बाजू पहिल्यांदाच समोर आली.
advertisement
advertisement
लहानपणापासून त्याला त्याच्या रंगावरून अनेक नकार आणि अपमान सहन करावा लागला होता. बिग बॉस 19 च्या घरात प्रणित मोरेनं सांगितलं. तो म्हणाला, "मी जेव्हा छोटा होता तेव्हा मला म्हणायचे तू डार्क ( काळा ) आहेस, त्यामुळे तू कुठेतरी कमी आहेस. सगळे चिडवायचे. ही गोष्ट माझ्या हातात नाही त्यासाठी मला बोललं जात आहे हे कळलं तेव्हा मला खूप वाईट वाटायचं."
advertisement
advertisement
advertisement
प्रणितला त्याच्या रंगावरूनही हिणवलं जायचं. त्याने सांगितलं. "मी जेव्हा शाळा आणि कॉलेजमध्ये होतो तेव्हा बोलायचा कॉन्फिडन्स नव्हता, मला इंग्रजी येत नव्हतं. त्याहून मोठी गोष्ट ही होती की, लोक मला जाणीव करून द्यायचे की तुला इंग्रजी येत नाही, तुला काही येत नाही. मग ते माझ्या दिसण्यावर कमेन्ट करायचे."
advertisement


