'रामायण'मधील लक्ष्मणाने धर्मेंद्र यांच्याकडून घेतलेली ही मौल्यवान गोष्ट, हेमा मालिनींना ही नव्हतं माहित
- Published by:Manjiri Pokharkar
Last Updated:
Sunil Lahri on Dharmendra : हिंदी सिनेसृष्टीतील दिग्गज अभिनेते धर्मेंद्र यांच्याकडून 'रामायण' मालिकेतील सुनील लहरी यांनी एक मौल्यवान गोष्ट घेतली होती. विशेष म्हणजे हेमा मालिनी यांनाही याबाबत माहिती नव्हतं.
advertisement
advertisement
advertisement
सुनील लहरी यांनी धर्मेंद्र यांच्याशी झालेल्या भेटीचे आणि आठवणींचे किस्से चाहत्यांसोबत शेअर केले. तसेच ‘रामायण’ फेम सुनील यांनी धर्मेंद्र यांचे कौतुक करताना ते कसे माणूस होते हे सांगितले. हे ऐकून चाहत्यांनी धर्मेंद्र यांच्या स्वभावाचे आणि त्यांच्या महानतेचे भरभरून कौतुक केले. सुनील लहरी यांनी सांगितले की त्यांनी धर्मेंद्र यांच्याकडून एक अतिशय मौल्यवान वस्तू खरेदी केली होती, ज्याबद्दल फार कमी लोकांना माहिती होती.
advertisement
advertisement
advertisement
सुनील लहरी पुढे सांगतात की जेव्हा डील फायनल झाली तेव्हा धर्मेंद्र यांनी त्यांना पहिला प्रश्न विचारला होता की, या घरात कोण राहणार? यावर सुनील म्हणाले की ते स्वतः या फ्लॅटमध्ये राहणार आहेत. त्यावेळी धर्मेंद्र यांना सुनील यांच्याबद्दल फारशी माहिती नव्हती. त्यामुळे जेव्हा सुनील यांनी सांगितले की त्यांनी ‘रामायण’मध्ये लक्ष्मणाची भूमिका केली आहे. तेव्हा धर्मेंद्र खूप आनंदी झाले आणि त्यांनी सुनील यांना मिठी मारून आशीर्वाद दिला.


