ऋषभ शेट्टीच्या 'कांतारा'मधल्या देवीवर वादग्रस्त वक्तव्य, आता रणवीर सिंहची जाहीर माफी, म्हणाला...
- Published by:Manjiri Pokharkar
Last Updated:
Ranveer Singh on Rishab Shetty Kantara Controversy : रणवीर सिंहने ऋषभ शेट्टीच्या 'कांतारा' या चित्रपटातील देवीला जाहीररित्या 'भूत' असं म्हणाला होता. त्यामुळे त्याच्यावर प्रचंड टीका झाली. आता सोशल मीडियावर खास पोस्ट शेअर करत अभिनेत्याने जाहीररित्या माफी मागितली आहे.
advertisement
रणवीर सिंह सध्या आपल्या आगामी 'धुरंधर' या चित्रपटाचं प्रमोशन करत आहे. या चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान त्याने ऋषभ शेट्टीच्या 'कांतारा' या चित्रपटावर भाष्य केलं आहे. व्हायरल व्हिडीओमध्ये रणवीर सिंह म्हणत होता,"ऋषभ शेट्टी मी तुझा सिनेमा थिएटरमध्ये बघितला. अभिनयही कमाल होता. विशेषत: जेव्हा तुझ्या अंगात फीमेल भूत येतं तो शॉट तर खूपच भारी होता".
advertisement
रणवीर सिंह पुढे 'कांतारा' चित्रपटातील ऋषभ शेट्टीच्या चामुंडा मातेच्या प्रवेशाचा एक सीन भर कार्यक्रमात करुन दाखवतो. ज्या पद्धतीने रणवीर सिंह हा सीन सादर करतो त्यानंतर सर्वत्र हशा पिकतो. ऋषभ शेट्टीलाही हसू अनावर होते. पण दुसरीकडे रणवीरने देवाचा अपमान केल्याचं नेटकऱ्यांचं मत होतं. 'धुरंधर'च्या रिलीजदरम्यान रणवीरने स्वत:च्याच पायावर कुऱ्हाड मारुन घेतली असल्याचं चाहते म्हणत आहेत.
advertisement
रणवीर सिंहने आता याप्रकरणी जाहीररित्या चाहत्यांची माफी मागितली आहे. सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत रणवीरने लिहिलं आहे,"ऋषभ शेट्टीच्या जबरदस्त अभिनयाला मला हायलाईट करायचं होतं. त्याने ज्यापद्धतीने हा सीन साद केलाय. त्यासाठी त्याने किती मेहनत घेतली आहे, याचा मला अंदाज आहे. त्यामुळे मला त्याचं कौतुकच आहे".
advertisement
advertisement
ऋषभ शेट्टीचा 'कांतारा' हा बहुचर्चित चित्रपट पौराणिक कथेवर आधारित होता. कर्नाटकातील तुळू समुदायाच्या देवांबद्दलची कथा या चित्रपटात दाखवण्यात आली होती. तुळू समाज आपल्या देवांचा प्रचंड आदर करतो. दरवर्षी मोठ्या उत्साहात ते आपल्या देवांचा उत्सव साजरा करतात. आता IFFI मध्ये रणवीरने या देवांचा अपमान केला आहे. चामुंडा मातेबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे त्याला प्रचंड ट्रोल करण्यात येत आहे. हिंदू जनजागृती समितीने त्याच्याविरोधात तक्रारदेखील दाखल केली आहे.
advertisement


