तुमच्या आई-बाबांनी Sholay किती रुपयांत पाहिला? आता तुम्हाला तिकीटासाठी द्यावे लागणार इतके पैसे!

Last Updated:
Sholay Ticket Price : 'शोले: द फायनल कट' हा चित्रपट 12 डिसेंबर 2025 रोजी थिएटरमध्ये रिलीज होणार आहे. पण 50 वर्षांपूर्वी रिलीज झालेल्या 'शोले'च्या तिकिटाची किंमत किती होती? जाणून घ्या.
1/7
 भारतीय सिनेमाचा चेहरामोहरा बदलून टाकणारा आजही क्लासिक म्हणून गौरवला जाणारा 'शोले' हा सुपरहिट चित्रपट आता 50 वर्षांनंतर 'शोले: द फायनल कट'च्या माध्यमातून नव्या रुपात प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

advertisement
2/7
 'शोले: द फायनल कट' या चित्रपटात प्रेक्षकांना पहिल्यांदाच 'शोले'चा मूळ ओरिजनल शेवट पाहता येणार आहे. येत्या 12 डिसेंबरला 'सिप्पी फिल्म्स'मार्फत भारतभरातील हजारांहून अधिक सिनेमागृहात 'शोले: द फायनल कट' हा चित्रपट प्रदर्शित होत आहे.

3/7
 'शोले: द फायनल कट' या चित्रपटात फक्त शेवटच नव्हे तर 1975 मध्ये रिलीज झालेल्या चित्रपटातील काही दृश्यंसुद्धा समाविष्ट करण्यात आली आहेत. 50 वर्षांनंतर चित्रपटाकडे पाहण्याची प्रेक्षकांची दृष्टी बदलली आहे. नैतिकतेच्या चौकटी सैल झाल्या आहेत. तसेच प्रेक्षकही बदलला आहे. त्यामुळे लेखक सलीम-जावेद आणि दिग्दर्शक रमेश सिप्पी हे काळाच्या पुढे कसे होते हे प्रेक्षकांना लक्षात येईल.

4/7
 'शोले: द फायनल कट' हा 3 तास 29 मिनिटांचा चित्रपट 12 डिसेंबर 2025 रोजी थिएटरमध्ये रिलीज होणार आहे. 4K रिस्टोअर केलेल्या वर्जनमध्ये हा चित्रपट दाखवला जाईल. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. त्यामुळे आता प्रेक्षकांची सिनेमाबाबतची उत्सुकता वाढली आहे.

5/7
 'शोले' या चित्रपटात अमिताभ बच्चन, धर्मेंद्र, जया बच्चन, हेमा मालिनी, अमजद खान, असरानी, संजीव कुमार, मॅक मोहन, सचिन पिळगांवकर हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत होते. 3 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये या चित्रपटाची निर्मिती करण्यात आली होती. या चित्रपटाने 50 वर्षांपूर्वी 35 रुपये कोटी रुपयांची कमाई केली होती.

6/7
 अमिताभ बच्चन यांनी काही दिवसांपूर्वी जुन्या आठवणींना उजाळा देत 'शोले' या चित्रपटाचं तिकिट शेअर केलं होतं. या तिकिटावर 20 रुपये किंमत असल्याचं पाहायला मिळालं. त्यामुळे 'शोले' हा चित्रपट 1975 मध्ये रिलीज झाला त्यावेळी त्याची किंमत फक्त 20 रुपये होती.

7/7
 'शोले: द फायनल कट' हा चित्रपट आता मल्टिप्लेक्समध्ये रिलीज होणार आहे. त्यामुळे या चित्रपटासाठी प्रेक्षकांना आता 99 रुपयांपासून ते 1500 रुपयांपर्यंत तिकीटाची किंमत मोजावी लागणार आहे.

Kolhapur News: खेळताना घरावर गेलेला चेंडू काढायला गेला अन् काळानं गाठलं, १३ वर्षाच्या अफानसोबत घडलं भयंकर
घरावर गेलेला चेंडू काढायला गेला अन्.., १३ वर्षाच्या अफानसोबत घडलं भयंकर
  • घरावर गेलेला चेंडू काढायला गेला अन्.., १३ वर्षाच्या अफानसोबत घडलं भयंकर

View All
advertisement