14व्या वर्षी लग्न, पतीच्या जाचाला कंटाळून बनली बोल्ड हिरोईन, 450 फिल्म्स करणाऱ्या अभिनेत्रीचा 36व्या वर्षी भयानक अंत

Last Updated:
भारतीय चित्रपटसृष्टीच्या इतिहासात अशी एक बोल्ड अभिनेत्री होऊन गेली, जिच्या एका आयटम साँगने बॉक्स ऑफिसवर अक्षरशः धुमाकूळ घातला होता.
1/10
मुंबई: भारतीय चित्रपटसृष्टीच्या इतिहासात अशी एक सुंदरी होऊन गेली, जिच्यावर बोल्डनेस आणि स्टारडमचा मुकुट होता. अभिनेत्रीच्या एका आयटम साँगने बॉक्स ऑफिसवर अक्षरशः धुमाकूळ घातला होता.

advertisement
2/10
ही अभिनेत्री आहे सिल्क स्मिता, जिच्याबद्दल बॉलिवूडमध्ये एक ब्लॉकबस्टर चित्रपट आला होता. 'द डर्टी पिक्चर' या चित्रपटातून विद्या बालनने सिल्म स्मिताची भूमिका साकारली होती. तिचे आयुष्य गरिबी, वैयक्तिक संघर्ष आणि शेवटी रहस्यमय मृत्यू या शॉकिंग घटनांनी भरलेले होते.

3/10
२ डिसेंबर १९६० रोजी आंध्र प्रदेशातील एल्लुरू येथे सिल्क स्मिताचा जन्म झाला. घरात दारिद्र्य असल्याने तिला मूलभूत सुविधा किंवा शिक्षणही मिळाले नाही. तिचे आयुष्य लहानपणापासूनच कठीण होते.

4/10
सिल्क स्मिताचे लग्न अवघ्या १४ व्या वर्षी झाले. मात्र, लग्नानंतर तिचे आयुष्य अधिकच वाईट झाले. तिचा नवरा तिला खूप मारायचा आणि सासरच्या लोकांनीही तिचे जगणे असह्य केले होते.

5/10
या जाचाला कंटाळून सिल्क स्मिताने एक दिवस सर्व काही सोडले आणि ती मद्रास येथे पळून गेली. तिथे एका नातेवाईकाच्या घरी आश्रय मिळाल्यावर तिने फिल्म इंडस्ट्रीत नशीब आजमावण्यास सुरुवात केली.

6/10
सुरुवातीला सिल्क स्मिताला मेकअप गर्ल म्हणून काम मिळाले. पण तिचे आकर्षक सौंदर्य आणि जिद्द यामुळे तिला लवकरच अभिनयाच्या संधी मिळू लागल्या. १९७९ मध्ये आलेल्या 'इनाये थेडी' या मल्याळम चित्रपटातून तिने अभिनयात पदार्पण केले.

7/10
सिल्क स्मिताने तिच्या करिअरमध्ये बोल्ड भूमिका आणि आयटम साँग्स स्वीकारून नाव कमावले. तिची मागणी इतकी वाढली होती की, ती एका वेळी सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्रींपैकी एक बनली.

8/10
अवघ्या १० ते १२ वर्षांच्या कारकिर्दीत सिल्क स्मिताने तमिळ, तेलुगु, मल्याळम, कन्नड आणि हिंदी अशा विविध भाषांमध्ये ४५० हून अधिक चित्रपट केले. वितरकही सांगायचे की, चित्रपटात सिल्क स्मिताचे एक आयटम साँग हवेच.

9/10
कमल हासन, रजनीकांत आणि चिरंजीवींसारख्या सुपरस्टार्ससोबत काम केलेल्या सिल्क स्मिताचे स्टारडम जास्त काळ टिकले नाही. एका जवळच्या मित्राच्या सल्ल्यावरून तिने निर्मिती क्षेत्रात प्रवेश केला आणि दोन चित्रपट बनवले. या प्रयत्नात तिला त्या काळात २ कोटी रुपयांचे मोठे नुकसान झाले.

10/10
या अपयशाचा तिच्या मानसिक आरोग्यावर खोल परिणाम झाला. तिला एकटेपणा आणि दारूचे व्यसन जडले. शेवटी, १९९६ मध्ये वयाच्या अवघ्या ३६ व्या वर्षी ती रहस्यमय परिस्थितीत मृत आढळली. तिने आत्महत्या केली की गूढ पद्धतीने तिचा मृत्यू झाला, हे आजही रहस्यच आहे.

Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement