'आमची इज्जत तुझ्या हातात', करिअर पिकवर असताना सोनाली बेंद्रेच्या आईनं असं का म्हटलं होतं?

Last Updated:
Sonali Bendre Throwback : अभिनेत्री सोनाली बेंद्रेचं करिअर पिकवर असताना तिच्या आईने आमची इज्जत तुझ्या हातात आहे असं म्हटलं होतं. काय होतं यामागचं कारण?
1/7
नव्वदच्या दशकातील सुंदर, सालस मराठी मुलगी जिनं बॉलिवूडमध्ये आपल्या अभिनयानं सगळ्यांची मनं जिंकली. आपल्या हास्यानेच आपल्या पहिली छाप पाडणारी अशी सोनाली बेंद्रे. मध्यमवर्गीय महाराष्ट्रीय कुटुंबातून आलेल्या सोनालीने कायमच सिनेमांत काम करण्याचं स्वप्न पाहिलं होतं.

advertisement
2/7
सोनालीचा तिच्या स्वप्नांवर इतका विश्वास होता की तिने अभिनयात करिअर करण्यासाठी वडिलांकडून तीन वर्ष मागितली होती. ती म्हणाली होती,
सोनालीचा तिच्या स्वप्नांवर इतका विश्वास होता की तिने अभिनयात करिअर करण्यासाठी वडिलांकडून तीन वर्ष मागितली होती. ती म्हणाली होती, "मला फक्त 3 वर्षे द्या. नाहीतर मी माझं शिक्षण पूर्ण करून IAS ची तयारी करेन."
advertisement
3/7
 तिने ती 3 वर्ष स्वत:ला दिली. आपलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी तिने स्वत:ला झोकून दिलं. इंडस्ट्रीत कोणीही गॉडफादर नसताना सोनालीनं तिच्या कष्टाने स्व:बळावर नाव कमावलं.

4/7
1995 मध्ये आलेल्या मणिरत्नमच्या Bombay सिनेमातील सोनालीचं 'हम्मा हम्मा' हे गाणं प्रचंड लोकप्रिय झालं. ए आर रहमानच्या या गाण्याने सोनालीच्या करिअरला चार चांद लावले. त्या गाण्यात सोनालीने केलेल्या डान्सने तिला खूप प्रसिद्धी मिळाली. प्रेक्षक तिच्या प्रेमात पडले. हे गाणं तिच्या करिअरमधील महत्त्वाचा टप्पा ठरला. त्यानंतर तिला पुन्हा मागे वळून पाहण्याची गरज भासली नाही.

5/7
'हम्मा हम्मा' गाणं हिट झाल्यानंतर सोनाली 1996 मध्ये आलेल्या 'दिल जले' सिनेमात अजय देवगणबरोबर दिसली. सिनेमातील सोनालीचा अभिनय प्रेक्षकांना खूप आवडला. तिचं हास्य, तिची एनर्जी, लूक आणि गाणी खूप लोकप्रिय झाली.

6/7
याच काळात अभिनेत्री म्हणून नाव मोठं होत असताना तिच्या आईने तिला ताकिद दिली होती. आमची इज्जत तुझ्या हातात आहे असं त्यांनी सांगितलं होतं.

7/7
सोनाली म्हणाली होती, माझी आईने नेहमी मला फ्रिडम दिलं. ती कधीच सेटवर आली नाही. ती म्हणायची जर तू ऑफिसला गेलीस तर मी तुझ्या शेजारी येऊन बसेन का?’ त्यामुळे मी तुझ्या सेटवरही येणार नाही. ती नेहमी मला सांगायची की आमची इज्जत आता तुझ्या हातात आहे. आई-वडिलांच्या विश्वासामुळे मला अधिक जबाबदार बनवलं. ते आजपर्यंत माझ्या कामात आणि आयुष्यात दिसत आहे.

Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement