Care Of Trees In Summer : कडक उन्हात झाडं बिलकुल सुकणार नाहीत, फॉलो करा या टिप्स, राहतील हिरवीगार
- Published by:Mohan Najan
- Reported by:Prashant Pawar
Last Updated:
उन्हाळ्यात झाडांची देखभाल म्हणजे केवळ पाणी देणेच नव्हे तर झाडांच्या एकूण आरोग्याची काळजी घेणेही महत्त्वाचे असते. ही काळजी कशी घ्यावी? याबद्दलचं कृषी अभ्यासक युवराज जंगले यांनी माहिती दिली आहे.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
झाडांच्या पानांवर उन्हाळ्यात धूळ साचते ज्यामुळे झाडांचे श्वसन आणि अन्न तयार करण्याची प्रक्रिया अडथळलेली जाते. याशिवाय, धुळीमुळे झाडांवर कीटक आणि बुरशीजन्य रोगांची लागण होण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे झाडांच्या पानांवर हलक्या पाण्याचा मारा करून ती स्वच्छ ठेवणे गरजेचे आहे. झाडांवर वेळोवेळी पाण्याचा हलका शिंपडाकरून ही धूळ स्वच्छ करता येते, असं युवराज जंगले सांगतात.
advertisement
झाडांना केवळ पाणी देऊन उपयोग होत नाही तर त्यांना योग्य पोषणही मिळाले पाहिजे. उन्हाळ्यात सेंद्रिय खतांचा वापर केल्यास झाडांची वाढ चांगली होते आणि त्यांची प्रतिकारशक्ती वाढते. दर पंधरा दिवसांनी झाडांना कंपोस्ट खत, गांडूळ खत किंवा इतर नैसर्गिक खते दिल्यास ते बळकट राहतात. याशिवाय, कुंडीतील झाडांना गरजेप्रमाणे नवीन माती घालून पुनर्लावणी करावी लागते.
advertisement
झाडांची काळजी घेणे म्हणजे निसर्गाशी आपले नाते अधिक घट्ट करणे होय. उन्हाळ्यात झाडांची नीट काळजी घेतली तर ती अधिक काळ ताजीतवानी आणि सजीव राहतात. झाडे देखील आपल्याला प्राणवायू देतात, सावली देतात आणि पर्यावरणाचा समतोल राखतात. त्यामुळे झाडांशी मैत्री करा आणि त्यांच्या देखभालीला आपल्या दिनचर्येचा भाग बनवा, असंही युवराज जंगले सांगतात.


