Home Decor : घरात 'हे' बदल करा, छोट्या फ्लॅटला मिळेल लॅव्हिश लूक! घर दिसेल भव्य आणि आकर्षक
- Published by:Pooja Jagtap
Last Updated:
home interior in budget : घर हा प्रत्येकासाठी खूपच जिव्हाळ्याचा विषय आहे. पण नुसतं घर घेणं पुरेसं नसतं. ते घर सजावणंही तितकंच महत्त्वाचं असतं. बरेच लोक काही कारणास्तव लहान घर घेतात किंवा त्यांना घ्यावं लागतं. मात्र या छोट्या घरालाही तुम्ही भव्य आणि सुंदर बनाव शकता. तेही काही सोप्या सोप्या टिप्स वापरून. चला पाहूया ते कसे..
advertisement
मोठे आरसे : लहान घरात मोठे आरसे लावल्यास ते क्लासिक आणि प्रभावी दिसतात. एखाद्या रिकाम्या भिंतीवर तुम्ही मोठा, उंच आरसा लावू शकता. तो खिडकीसमोर ठेवल्यास जास्त चांगले. कारण आरसे प्रकाश परावर्तित करतात, ज्यामुळे खोली मोठी दिसते आणि घरात प्रकाशी खूप येतो. तुम्ही तुम्हाला हवे त्या पद्धतीचे आरसे निवडू शकता. हल्ली बाजारात खूप सुंदर आरसे उपलब्ध आहेत, जे घराला आलिशान लूक देऊ शकतात.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement


