Thyroid Symptoms : शरीरात वाढतोय थायरॉइडच्या धोका, कसे ओळखाल? या 5 भागातील वेदना असतात संकेत
- Published by:Pooja Jagtap
Last Updated:
Thyroid pain area : बऱ्याचदा आपल्याला होणारे त्रास आपल्या लक्षात येत नाही. बहुतांशी महिलांच्या बाबतीत हे घडते. कारण त्यांना वेदनांकडे दुर्लक्ष करण्याची जास्त सवय असते. थायरॉईडचा त्रासही असाच आहे. मग आपल्या शरीरात थायरॉईड वाढतोय हे कसे ओळखावे? देशभरात मोठ्या प्रमाणात लोक थायरॉईडच्या समस्येने त्रस्त आहेत. यावर वेळीच उपचार न केल्यास ते खूप घातक ठरू शकते. चला तर मग पाहूया थायरॉइडची लक्षणं काय आहेत.
थायरॉईड ही आपल्या मानेसमोर फुलपाखराच्या आकाराची एक छोटी ग्रंथी असते, जी शरीरात हार्मोन्स तयार करण्याचे काम करते. थायरॉईड संप्रेरके शरीरात असंतुलित झाल्यास थायरॉईडची समस्या उद्भवते. थायरॉईडचे प्रामुख्याने दोन प्रकार आहेत, ज्यामध्ये हायपोथायरॉईड आणि हायपरथायरॉइडचा समावेश होतो. थायरॉईड हार्मोन्स असंतुलित झाल्यावर शरीराच्या अनेक भागात वेदना सुरू होतात. या वेदना ओळखून त्यावर त्वरित उपचार करणे महत्त्वाचे आहे.
advertisement
मानदुखी : हेल्थलाइनच्या बातमीनुसार, थायरॉईडची समस्या जसजशी वाढत जाते, तसतशी पहिली समस्या जाणवते ती म्हणजे मानदुखी. वास्तविक, थायरॉईड ग्रंथी मानेसमोर असते. अशा परिस्थितीत, जर त्यात कोणत्याही प्रकारची समस्या असेल तर त्याचा सर्वात जास्त परिणाम मानेच्या भागावर होतो. यामुळे केवळ मानेमध्ये दुखत नाही, तर घशातही खूप सूज येते.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement


