Chhappan Bhog : देवाला '56 भोग'च का अर्पण केला जातो? ही संख्या आली कुठून? या अद्भुत परंपरेमागे खास गणित
- Published by:Devika Shinde
Last Updated:
इष्ट देवतेवरचे प्रेम आणि कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी साध्या फळांपासून ते पंचपक्वान्नांपर्यंत विविध पदार्थ अर्पण केले जातात. परंतु, अनेक मोठ्या मंदिरांमध्ये आणि विशेषतः श्रीकृष्ण जन्माष्टमी किंवा अन्नकूट उत्सवाच्या वेळी, देवाला 'छप्पन भोग' (Fifty-Six Bhog) अर्पण करण्याची एक भव्य आणि अनोखी परंपरा आहे.
भारतात देवाला नैवेद्य किंवा भोग चढवण्याची परंपरा खूपच सामान्य आहे. लोक पूज-अर्चना करताना किंवा उपवास सोडताना देवाला नैवोद्य दाखवतात. नैवेद्यांमध्ये वेगवेगळे प्रकार असतात. काही लोक डाळ-भात किंवा दही-भात वैगरे देवाला नैवेद्य दाखवतात. तर काही लोक गोडाचं नैवेद्य दाखवतात. तर काही ठिकाणी फळं, मांसाहार दाखवण्याची देखील प्रथा आहे.
advertisement
इष्ट देवतेवरचे प्रेम आणि कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी साध्या फळांपासून ते पंचपक्वान्नांपर्यंत विविध पदार्थ अर्पण केले जातात. परंतु, अनेक मोठ्या मंदिरांमध्ये आणि विशेषतः श्रीकृष्ण जन्माष्टमी किंवा अन्नकूट उत्सवाच्या वेळी, देवाला 'छप्पन भोग' (Fifty-Six Bhog) अर्पण करण्याची एक भव्य आणि अनोखी परंपरा आहे.
advertisement
छप्पन म्हणजे अंकात 56यामध्ये खरोखरच देवाला 56 प्रकारचे पदार्थ बनवून देवाला दाखवले जातात. पण तुम्हाला कधी असा प्रश्न पडला आहे का की देवाला नैवेद्य दाखवण्यासाठी किंवा भोग चढवण्यासाठी 56 पदार्थांची निवड का केली असावी? म्हणजे हाच आकडा का निवडला असावा? ही संख्या 50, 60 किंवा 100 का नाही, म्हणजे या संख्यांच्या पदार्थांचे जेवण का नाही दाखवत?
advertisement
advertisement
advertisement
कथा अशी आहे की, गोकुळवासी दरवर्षी इंद्रदेवाची पूजा करत असत. एकदा बाळकृष्णाने गोकुळवासीयांना सांगितले की इंद्रदेवाऐवजी त्यांनी गोवर्धन पर्वताची पूजा करावी, कारण तोच त्यांना पाऊस आणि अन्न देतो. यामुळे इंद्रदेव क्रोधीत झाले आणि त्यांनी गोकुळात सात दिवस आणि सात रात्र मुसळधार पाऊस पाडला. त्यावेळी गोकुळवासीयांना वाचवण्यासाठी भगवान श्रीकृष्णाने आपला करंगळीवर (Little finger) सलग सात दिवस गोवर्धन पर्वत उचलून धरला आणि संपूर्ण गावाचं रक्षण केलं.

या सात दिवसांमध्ये कृष्णाने कोणताही आहार घेतला नव्हता. या घटनेनंतर गोकुळवासीयांना आपली चूक लक्षात आली. कृष्णाच्या भुकेची आणि तपस्येची भरपाई करण्यासाठी, यशोदा मातेसह सर्व गोकुळवासीयांनी एकत्र येऊन कृष्णाला एका दिवसात तो जितके खात होता, त्यापेक्षा आठ पटीने जास्त पदार्थ खायला घालण्याचा निर्णय घेतला.
advertisement
56 हे गणित आले कुठून?या कथेनुसार, भगवान श्रीकृष्ण दिवसाला 1 वेळा भोजन करत असत आणि त्याचे 8 पट असं भोजन देण्याचं निश्चित झालं. कृष्णाने सलग 7 दिवस आहार घेतला नव्हता.या 7 दिवसांच्या प्रत्येक वेळेच्या (8 वेळा) भोजनाची भरपाई करण्यासाठी गोकुळवासीयांनी प्रसाद तयार केला. 8 (वेळा) X 7 (दिवस) = 56अशाप्रकारे, सात दिवसांच्या भुकेची भरपाई करण्यासाठी, देवाच्या दररोजच्या आहाराच्या आठ पटीने जास्त, म्हणजेच ५६ प्रकारच्या पदार्थांचा नैवेद्य तयार करण्याची परंपरा सुरू झाली.
advertisement
छप्पन भोगाचे महत्त्वछप्पन भोग म्हणजे केवळ 56 पदार्थांचा ढीग नाही, तर ते भक्तीची पराकाष्ठा (Extreme Devotion) आणि कृतज्ञता (Gratitude) व्यक्त करण्याचे माध्यम आहे. यामध्ये विविध मिठाई (Sweets), स्नॅक्स (Savories), फळे, पेय आणि धान्य पदार्थांचा समावेश असतो, ज्यामुळे देवतेच्या प्रत्येक आवडत्या पदार्थाचा मान ठेवला जातो.