आजचं हवामान: मराठवाड्यात दुपारी धोका वाढणार, पुन्हा तेच संकट, बीडसह 4 जिल्ह्यांना अलर्ट
- Published by:Shankar Pawar
- Reported by:Prashant Pawar
Last Updated:
Marathwada Weather: मराठवाड्यात उष्णतेचा पारा चढला असून आज तापमान 44 अंशांपर्यंत जाण्याची शक्यता आहे. आजचा हवामान व तापमानाचा अंदाज जाणून घेऊ.
advertisement
advertisement
advertisement
लातूर जिल्ह्यातही 22 एप्रिल रोजी कमाल तापमान 41 अंश आणि किमान तापमान 27 अंश राहील. 23 एप्रिलला तापमान 42 अंशापर्यंत वाढू शकते. येत्या काही दिवसांत आकाश निरभ्र राहील व उन्हाचा तडाखा अधिक जाणवेल. त्यामुळे दिवसा थेट सूर्यप्रकाशात फिरणे टाळावे व शक्य असल्यास घरात राहून आवश्यक काळजी घ्यावी. शेतकरी आणि मैदानी कामगारांनी विशेष काळजी घ्यावी.
advertisement
धाराशिव जिल्ह्यात 22 एप्रिलला कमाल तापमान 42 अंश सेल्सिअस आणि किमान तापमान 28 अंश राहील. 23 एप्रिल व त्यानंतर काही दिवस तापमान 43 अंशांपर्यंत वाढण्याची शक्यता आहे. येथेही आकाश स्वच्छ राहिल्यामुळे प्रखर ऊन जाणवेल. उष्माघात टाळण्यासाठी थंड पेय सेवन करणे, थेट ऊन टाळणे आणि शक्यतो घरात राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
advertisement
advertisement
उष्णतेची तीव्रता अधिक असल्याने लहान मुले, वयोवृद्ध आणि आजारी व्यक्तींनी विशेष काळजी घ्यावी, असे आवाहन हवामान विभागाने केले आहे. नागरिकांनी शक्यतो दुपारी 12 ते 4 वाजेच्या दरम्यान घराबाहेर जाणे टाळावे. भरपूर पाणी प्यावे, हलके व सैलसर कपडे घालावेत आणि बाहेर पडताना डोक्यावर टोपी किंवा छत्रीचा वापर करावा. उष्माघाताची लक्षणे जाणवली तर तातडीने डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.


