मुंबई-नाशिक लोकलचं स्वप्न पूर्ण होणार! नव्या रूटला मंजूरी, मार्ग कसा जोडला जाणार?
Last Updated:
Nashik-Mumbai Local : मुंबई-नाशिक प्रवास आता होणार अधिक सोपा होणार असून कसारा-मनमाड मार्गावर नवीन रेल्वे मार्गिकांना केंद्रीय रेल्वे मंजुरी दिली आहे.
नाशिक- मुंबई रेल्वे मार्गावर मोठी सुधारणा होणार असल्याची माहिती समोर आली आहे. केंद्र सरकारने मनमाड-कसारा आणि कसारा-मुंबई या मार्गांवर प्रत्येकी दोन नवीन रेल्वे मार्गिका उभारण्यास मंजुरी दिलेली असून या निर्णयामुळे नाशिक ते मुंबईदरम्यान लोकल सेवा सुरू होण्यास गती मिळणार आहे आणि अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या नवीन गाड्यांसाठीच्या स्लॉट समस्येचेही समाधान होईल, असा विश्वास खासदार राजाभाऊ वाजे यांनी व्यक्त केला आहे.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
या दोन नवीन मार्गिकांमुळे रेल्वे गाड्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढवता येईल. लोकल ट्रेनचा मार्ग मोकळा होऊन त्यावरचा भार कमी होईल. त्यामुळे कसारा मार्गावर धावणाऱ्या लोकलच्या वेळापत्रकात सुधारणा होण्याची शक्यता आहे. सध्या मालवाहतूक आणि इतर गाड्यांमुळे लोकलला उशिर होतो, पण या मार्गिकांवर मालगाड्या वळवल्या गेल्या तर लोकल सेवेला गती मिळेल.
advertisement


