Kolhapur: उसाने भरलेला ट्रक 5 गाड्यांना धडकला अन् hyundai verna वर उलटला, नशीब चांगलं म्हणून ड्रायव्हर वाचला, कोल्हापुरातील PHOTOS

Last Updated:
शहरातील सायबर चौकात एक विचित्र अपघात झाला. भरधाव वेगात आलेल्या ट्रकने सिग्नलवर उभ्या ४ ते ५ गाड्यांना धडक दिली. या अपघातात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. पण, एक hyundai verna चालक नशिब बलवत्तर असल्यामुळे थोडक्यात बचावला. (ज्ञानेश्वर साळुंखे, प्रतिनिधी)
1/7
कोल्हापूरमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. शहरातील सायबर चौकात एक विचित्र अपघात झाला. भरधाव वेगात आलेल्या ट्रकने सिग्नलवर उभ्या ४ ते ५ गाड्यांना धडक दिली. या अपघातात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. पण, एक hyundai verna चालक नशिब बलवत्तर असल्यामुळे थोडक्यात बचावला.

advertisement
2/7
कोल्हापूरमधील सायबर चौकात मंगळवारी रात्री विचित्र अपघात घडला. चौकाजवळ असलेल्या सिग्नलवर गाड्या थांबलेल्या होत्या. त्याचवेळी उसाने भरलेला ट्रक भरधाव वेगात आला आणि समोर असलेल्या वाहनांना धडकला.

3/7
भरधाव ट्रकने समोर असलेल्या खासगी बस, मिनी टॅम्पो, टोयाटो इनोव्हाला धडक दिली. हा अपघात इतका भीषण होता की, धडक दिल्यानंतर ट्रॅक डिव्हायडरला धडकला आणि उलटला.

4/7
ट्रक जसा उलटला त्याचवेळी एक hyundai verna कार ट्रकखाली सापडली. ट्रकखाली सापडल्यामुळे hyundai verna चा चुराडा झाला.

5/7
सुदैवाने, ट्रक जेव्हा उलटला तेव्हा तो बाजूला उभ्या असलेल्या बसवर आदळला. त्यामुळे ट्रक हा पूर्णपणे hyundai verna वर कोसळला नाही. त्यामुळे verna गाडीच्या चालकाला खिडकीतून बाहेर पडण्यास संधी मिळाली.

6/7
अचानक झालेल्या या अपघातामुळे एकच खळबळ  उडाली. घटनेची माहिती मिळताच कोल्हापूर वाहतूक पोलीस घटनास्थळी दाखल झाले. अपघातामुळे काही वाहतूक जाम झाली होती.

7/7
सुदैवाने या विचित्र अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. hyundai verna चालकाला सुखरूपपणे बाहेर पडता आलं. मात्र, या अपघातात वाहनांचं प्रचंड नुकसान झालं आहे. ट्रकचालकाने वाहनांना धडक का दिली याचं कारण अद्याप समोर येऊ शकलं नाही.

Tukaram Mundhe : तुकाराम मुंढे प्रकरणावरून भाजप आमदाराला धमकी,  सभागृहात गदारोळ, मुख्यमंत्री म्हणाले...
तुकाराम मुंढे प्रकरणावरून भाजप आमदाराला धमकी, सभागृहात गदारोळ, मुख्यमंत्री म्हण
  • तुकाराम मुंढे प्रकरणावरून भाजप आमदाराला धमकी, सभागृहात गदारोळ, मुख्यमंत्री म्हण

View All
advertisement