तुमचं आधार पॅन लिंक आहे की नाही? या प्रोसेसने करा चेक, अन्यथा 1 जानेवारीनंतर येईल प्रॉब्लम
- Published by:Mohini Vaishnav
Last Updated:
तुमचे आधार आणि पॅन कार्ड लिंक केलेले नसतील तर बँक आणि टॅक्स संबंधित कामांमध्ये प्रॉब्लम येऊ शकतो. 31 डिसेंबर 2025 पूर्वी लिंक करणे आवश्यक आहे. तुमचा आधार-पॅन लिंक स्टेटस चेक करण्याची सोपी ट्रिक जाणून घ्या.
आधार कार्ड आणि पॅन कार्ड हे भारतीयांसाठी सर्वात आवश्यक कागदपत्रांपैकी एक आहेत. जे अगदी लहान कामांसाठी देखील वापरले जातात. पर्सनल ओळखीसाठी आधार कार्ड हे सर्वात महत्वाचे डॉक्यूमेंट आहे, तर पॅन कार्ड कोणत्याही भारतीय नागरिकाच्या उत्पन्नाचा आणि करांचा हिशेब ठेवण्यासाठी आवश्यक आहे. भारत सरकारने हे दोन महत्वाचे डॉक्यूमेंट लिंक करणे अनिवार्य केले आहे.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
तुमचे आधार आणि पॅन कार्ड लिंक न करण्याचे तोटे काय? : भारत सरकारच्या आधार आणि पॅन कार्ड लिंक करण्याच्या नियमांनुसार, एखाद्या नागरिकाने 31 डिसेंबर 2025 पर्यंत त्यांचे आधार आणि पॅन कार्ड लिंक केले नाही, तर त्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागू शकते. यामध्ये त्यांचे पॅन कार्ड निष्क्रिय करणे, बँक व्यवहारांमध्ये अडचणी, त्यांच्या उत्पन्नावर वाढलेला टीडीएस (लक्ष्यित वजावट) कर आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे, त्यांचे आयकर रिटर्न भरण्यात अडचण यांचा समावेश असू शकतो.










