Success Story : उच्च शिक्षणानंतर निवडला व्यवसायाचा मार्ग, नीलम यांनी सुरू केला मोमोजचा स्टॉल, महिन्याला लाखभर कमाई
- Reported by:Pooja Satyavan Patil
- Published by:Mohan Najan
Last Updated:
सुरुवातीला अनेक अडचणींचा सामना करावा लागला. पण हार न मानता नीलम यांनी आपलं काम चालू ठेवलं. आज त्या मोमोजच्या स्टॉलमधून महिन्याला जवळपास लाखभर रुपयांची कमाई करतात.
advertisement
advertisement
नीलम दिघे यांनी सांगितलं की त्यांना लहानपणापासूनच स्वतःचा व्यवसाय करायची इच्छा होती. त्यामुळे उच्च शिक्षण असूनही त्यांनी नोकरीचा मार्ग न निवडता व्यवसायाकडे वळण्याचा निर्णय घेतला. सुरुवातीला कोणता व्यवसाय करावा याबाबत संभ्रम होता, मात्र मार्केटचा अभ्यास केल्यानंतर त्यांनी मोमोजचा व्यवसाय सुरू करण्याचं ठरवलं आणि त्यांनी 2023 मध्ये स्वतःचा मोमोजचा व्यवसाय सुरू केला.
advertisement
नीलम यांनी सांगितलं की स्टॉलवर मिळणारे सर्व पदार्थ त्या स्वतःच घरी बनवतात. त्यामुळे पदार्थांना घरची चव येते आणि महत्त्वाचं म्हणजे व्यवसायात भांडवलही कमी लागतं. कमी भांडवलात चांगला व्यवसाय करता येतो. ग्राहकांना योग्य भाव आणि चांगली क्वालिटी देणं व्यवसायात महत्त्वाचं आहे. या सगळ्यामुळे या व्यवसायातून महिन्याला लाखभर रुपयांचा नफा मिळतं असल्याचं त्यांनी सांगितलं.
advertisement
मोमोज व्यवसायाला ग्राहकांकडून चांगला प्रतिसाद मिळू लागल्यानंतर नीलम यांनी मोमोजसोबत पोटॅटो स्प्रिंग रोल, पोटॅटो चाट स्प्रिंग रोल, फ्रेंच फ्राईज, फ्रेंच चाट फ्राईज असे अनेक पदार्थ विक्रीस ठेवायला सुरुवात केली. कमी किमतीत चांगली क्वालिटी दिल्यामुळे ग्राहकांची गर्दी त्यांच्या स्टॉलवर मोठ्या प्रमाणात होते. निगडी येथील मधुकर ब्रीज मोमोज कट्टा या ठिकाणी नीलम यांचा स्टॉल आहे.










