Weather Alert: हाडं गोठवणारी थंडी! पुणे-मुंबईत वारं फिरलं, हवामानात मोठे बदल, रविवारी पुन्हा अलर्ट
- Published by:Shankar Pawar
- Reported by:Namita Suryavanshi
Last Updated:
Weather Alert: महाराष्ट्रातील मुंबईसह कोकणात थंडीचा जोर वाढत आहे. तर विदर्भातील काही जिल्ह्यांना रविवारी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
राज्यात गेल्या काही दिवसांपासून तापमानात सतत चढ-उतार सुरू आहेत. काही भागात गारठा वाढला असून काही ठिकाणी कमाल तापमानात देखील वाढ झाल्याचे चित्र आहे. विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये सकाळच्या वेळेत जाणवणारी थंडी पुन्हा तीव्र होत असून, काही भागांत तापमान एक अंकी स्तराकडे झुकताना दिसत आहे. 7 डिसेंबर रोजी मुंबईसह कोकण किनारपट्टी, पुणे, ठाणे आणि नवी मुंबई या भागांमधील हवामान अंदाज जाणून घेऊ.
advertisement
मुंबईसह कोकण किनारपट्टी भागामध्ये थंडीचा जोर वाढला आहे. मुंबईत आज सकाळी हलकी थंडी जाणवेल. किमान तापमान 19°C च्या आसपास तर दिवसा 30–31°C राहण्याची शक्यता आहे. पालघरमध्ये थंडी मुंबईपेक्षा जास्त असून तापमान 16–18°C पर्यंत खाली जाईल. रायगड–रत्नागिरी–सिंधुदुर्ग विभागात थंडी स्थिर असून किमान तापमान 17–19°C दरम्यान राहील. दिवसा या जिल्ह्यांत तापमान 30–32°C पर्यंत जाईल. आकाश साफ, वारा हलका गार आणि संध्याकाळी पुन्हा गारवा जाणवेल.
advertisement
ठाणे, नवी मुंबई , कल्याण या भागात हवामान स्थिर असून सकाळी हलका गारवा असेल. आज ठाणे आणि नवी मुंबईत किमान तापमान 18–19°C, तर दिवसा 30–32°C राहील. कल्याण–डोंबिवली भागात तापमान 16–18°C च्या आसपास गेल्यामुळे सकाळी थोडी जास्त थंडी जाणवेल. तर दुपारी वातावरण उबदार राहील. हवा कोरडी, आकाश स्वच्छ आणि गेले दोन दिवस जरी आकाश ढगाळ वाटत असेल तरी आज दिवसभर पावसाची शक्यता नाही.
advertisement
advertisement
एकंदरीत राज्यातील मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रात आज हवामान शांत व कोरडे राहील. विदर्भातील 3 जिल्ह्यांत थंडीची लाट राहील. तसेच छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर, सोलापूर, जळगाव, धुळे, नंदुरबार या जिल्ह्यांत सकाळी तापमान 12–15°C च्या दरम्यान असून काही भागांत आणखी घट होण्याची शक्यता आहे. पुढील काही दिवस महाराष्ट्रातील हवामान स्थीर राहील.


