advertisement

Nashik Tourist: विकेंडला नाशिकमधल्या 'या' 5 ठिकाणी नक्कीच भेट, चौथं ठिकाण तुम्ही कधी पाहिलंही नसेल

Last Updated:
कोणत्याही ऋतूमध्ये जा, तुम्हाला नाशिकमध्ये थंड वातावरण अनुभवता येते. धार्मिक आणि ऐतिहासिक दृष्टीने महत्त्वाचं असणाऱ्या ह्या ठिकाण कायमच पर्यटकांची फार रेलचेल असते. येत्या विकेंडला जर तुमचा काही फिरण्याचा प्लॅन असेल तर, तुम्ही नाशिकमधील काही ठिकाणांचा फिरायला जाण्यासाठी विचार करू शकता, तर जाणून घेऊया कोण कोणते ते ठिकाणे आहेत...
1/7
 द्राक्षांचे शहर म्हणून ओळख असलेला नाशिक जिल्हा कायमच पर्यटकांच्या फार आवडीचा जिल्हा आहे. धार्मिक दृष्टीने आणि ऐतिहासिक दृष्टीने महत्त्वाचं समजलं जाणाऱ्या या जिल्ह्यामध्ये पर्यटनाच्या दृष्टीने अनेक ठिकाणे आहेत.

2/7
 येत्या विकेंडला तुम्ही नाशिक जिल्ह्यामध्ये मनमोहक निसर्ग, फेसाळणाऱ्या दऱ्या आणि डोळे दिपवून टाकणारे धरण या सर्वांमुळे साहजिकच नाशिकच्या निसर्ग सौंदर्यामध्ये भर पडते. नाशिकमध्ये तुम्ही फक्त देव दर्शनासाठीच नाही तर, निसर्गाचा आनंद लुटण्यासाठीही जाऊ शकता.

3/7
 दिंडोरी तालुक्यातील वणी गावामध्ये सप्तशृंगी देवी आहे. हे ठिकाण नाशिकपासून सुमारे 65 किमी. अंतरावर आहे. डोंगर माथ्यावर देवीचे मंदिर आहे. गडाच्या माथ्यावरून आजूबाजूच्या विस्तीर्ण दऱ्यांचे आणि घाटांचे डोळे दिपवून टाकणारे दृश्य दिसते. येथील हवामान बहुतेक वेळा थंड असते. तुम्ही रोप-वे किंवा गडाच्या पायऱ्या चढून जाऊ शकता.

4/7
 बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेले त्र्यंबकेश्वर हे धार्मिक स्थळ तर आहे. सोबतच तिकडे निसर्गरम्य डोंगर आणि हिरवीगार वनराई सुद्धा मोठ्या प्रमाणावर आहे. त्र्यंबकेश्वर येथे ब्रह्मगिरी पर्वताची भव्यता आणि आजूबाजूचे शांत वातावरण मन मोहून टाकते. हे ठिकाण नाशिकपासून सुमारे 30 किमी अंतरावर आहे.

5/7
 पांडव लेणी म्हणजे पुरातन कलेचा अद्भुत असा नमुना आहे, इथे गौतम बुद्धांचे चित्रे कोरली आहेत. पाथर्डी फाट्यापासून काही तासांच्या अंतरावर लेणी असून संपूर्ण डोंगरामध्ये ती कोरली आहे. फक्त दोन तासात तुम्ही संपूर्ण लेणी पाहून पुढचा प्रवास करू शकाल. या ठिकाणी तुम्ही रेल्वे स्टेशन किंवा बस स्टॅण्डवरून रिक्षाने सहज जाऊ शकणार आहात.

6/7
 सोमेश्वर धबधबा नाशिक शहरापासून अवघ्या आठ ते दहा किलोमीटर अंतरावर आहे. गंगापूर गावाच्या शिवारात असलेल्या बालाजी मंदिरालगत दूधसागर धबधबा कायमच खळखळून वाहताना दिसतो. या ठिकाणी तुम्ही तुमचा फावला वेळ घालवण्यासाठी नक्की जाऊ शकता. इथलं आजूबाजूचं निसर्ग पाहून नक्कीच तुमचं मन प्रसन्न होईल.

7/7
 'वाईन सिटी' म्हणून नाशिकची ओळख आहे. नाशिक शहरामध्ये 'सुला विनयार्ड्स' असून इथे महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून लोकं आवर्जुन भेट देतात. 'सुला विनयार्ड्स' मध्ये तुम्ही वाइन टेस्टिंग करू शकता, द्राक्षांच्या मळ्यांमध्ये फेरफटका मारू शकता आणि इटालियन शैलीतील रेस्टॉरंटमध्ये जेवणाचा आनंद घेऊ शकता. हे ठिकाण नाशिकपासून सुमारे 13 किमी अंतरावर आहे.

IND vs SA : टीम इंडियासाठी वाईट बातमी, ड्रेसिंग रूममध्ये सगळ्यांचे चेहरे पडले, नेमकं काय घडलं?
टीम इंडियासाठी वाईट बातमी, ड्रेसिंग रूममध्ये सगळ्यांचे चेहरे पडले, नेमकं काय घडल
  • टीम इंडियाला मोठा धक्का

  • सरावा दरम्यान स्टार खेळाडूला दुखापत

  • साऊथ आफ्रिकेविरूद्ध सामन्याआधी टेन्शन वाढलं

View All
advertisement