Vastu Shastra : घराच्या मुख्य दरवाजासाठी कोणती दिशा सर्वात शुभ? पूर्व, पश्चिम, उत्तर की दक्षिण? जाणून घ्या वास्तुशास्त्राचं मत
- Published by:Devika Shinde
Last Updated:
अनेक लोक घर घेताना किंवा बांधताना वास्तुचे नियम काटेकोरपणे पाळतात, तर काहीजण या गोष्टींकडे दुर्लक्ष करतात. पण वास्तु तज्ञ सांगतात की घराचा मुख्य दरवाजा योग्य दिशेला नसेल तर त्याचा थेट परिणाम घरातील सुख-शांती आणि आर्थिक स्थितीवर होऊ शकतो.
भारतीय संस्कृतीत वास्तुशास्त्र हे केवळ घर बांधणीपुरते मर्यादित नाही, तर ते जीवनातील सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह टिकवून ठेवण्यासाठीही महत्त्वाचे मानले जाते. आपल्या आजूबाजूचे वातावरण आणि घरातील प्रत्येक गोष्ट दरवाजा, स्वयंपाकघर, देवघर, खिडक्या यांचा आपल्या जीवनावर परिणाम होतो, असा अनेकांचा विश्वास आहे.
advertisement
अनेक लोक घर घेताना किंवा बांधताना वास्तुचे नियम काटेकोरपणे पाळतात, तर काहीजण या गोष्टींकडे दुर्लक्ष करतात. पण वास्तु तज्ञ सांगतात की घराचा मुख्य दरवाजा योग्य दिशेला नसेल तर त्याचा थेट परिणाम घरातील सुख-शांती आणि आर्थिक स्थितीवर होऊ शकतो. कारण मुख्य दरवाजातूनच लक्ष्मीदेवीचा प्रवेश होतो आणि घरात सकारात्मक ऊर्जा प्रवाहित होते.
advertisement
advertisement
घराच्या मुख्य दरवाजाची शुभ दिशावास्तुशास्त्रानुसार घराचा मुख्य दरवाजा ईशान्य (उत्तर-पूर्व) किंवा पूर्व-पश्चिम दिशेला असणे अत्यंत शुभ मानले जाते. प्रवेशद्वार पश्चिम दिशेच्या मधोमध असेल तर तोही समृद्धीचा सूचक मानला जातो. अशा घरात सुख, शांती आणि धनाचा वास असल्याचे मानले जाते.दरवाज्याचा आकार फार लहान किंवा फार मोठा नसावा, तर तो संपूर्ण इमारतीच्या आकाराच्या प्रमाणात असावा. कारण असंतुलित आकार घरात अस्थिरता आणतो, असे वास्तु सांगते.
advertisement
स्वयंपाकघराच्या दरवाजाची दिशाघरातील समृद्धी आणि आरोग्याचा संबंध स्वयंपाकघराशी जोडला जातो. त्यामुळे स्वयंपाकघराचा दरवाजा उत्तर, पश्चिम किंवा आग्नेय (दक्षिण-पूर्व) दिशेला ठेवणे शुभ मानले जाते. उत्तर आणि पश्चिम दिशा सकारात्मक ऊर्जेसाठी सर्वोत्तम मानल्या जातात.जर या दोन दिशा शक्य नसतील, तर आग्नेय दिशा योग्य ठरते कारण ती अग्नि तत्वाशी संबंधित आहे जे स्वयंपाकघरासाठी योग्य आहे.
advertisement
advertisement
advertisement
advertisement


