advertisement

पाण्याचा अंदाज चुकला अन् काळजाचा ठोका चुकला! पवना धरणात पोहताना तरुणाचा बुडून मृत्यू; मावळमध्ये हळहळ

Last Updated:

पाण्याची खोली, अचानक वाढणारा प्रवाह आणि सुरक्षेच्या अभावामुळे अशा दुर्घटना घडत असल्याचे वारंवार निदर्शनास येते.

News18
News18
गणेश दुडम, प्रतिनिधी
पुणे :  मावळ तालुक्यातील पवना धरण परिसरात घडलेल्या एका दुर्दैवी घटनेने संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे. धरणात बुडून 24 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला असून ऋतिक कैलास साखरे असे मृत तरुणाचे नाव आहे. ही घटना गुरुवारी दुपारच्या सुमारास घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, ऋतिक साखरे हा आपल्या काही मित्रांसह पर्यटनासाठी पवना धरण परिसरात आले होते. निसर्गरम्य परिसर आणि थंड वातावरणाचा आनंद घेत असताना सर्वजण धरणाजवळ थांबले. दरम्यान, पोहण्यासाठी धरणात उतरलेल्या ऋतिक यांना पाण्याची खोली आणि प्रवाहाचा अंदाज आला नाही. पुढे पुढे जात तो खोल पाण्यात गेला आणि काही क्षणांतच बुडू लागला. मित्रांनी त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला, मात्र यश आले नाही.
advertisement
घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी आणि मित्रांनी तत्काळ प्रशासनाला कळवले. त्यानंतर वन्यजीव रक्षक मावळ संस्थेचे बचाव पथक, स्थानिक पोलीस आणि ग्रामस्थांनी संयुक्तपणे शोधमोहीम सुरू केली. काही तासांच्या अथक प्रयत्नांनंतर ऋतिक यांचा मृतदेह पाण्याबाहेर काढण्यात आला. मृतदेह शवविच्छेदनासाठी नजीकच्या रुग्णालयात पाठविण्यात आला असून पुढील तपास पोलीस करीत आहेत.

साखरे कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला

advertisement
या घटनेमुळे साखरे कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. तरुण वयात घडलेल्या या दुर्घटनेने मित्रपरिवार आणि स्थानिक नागरिक शोकाकुल झाले आहेत. पर्यटनासाठी मोठ्या संख्येने पर्यटक पवना धरण परिसरात येत असतात. मात्र, पाण्याची खोली, अचानक वाढणारा प्रवाह आणि सुरक्षेच्या अभावामुळे अशा दुर्घटना घडत असल्याचे वारंवार निदर्शनास येते.
advertisement

धरण परिसरात फिरताना काळजी घेण्याचे आवाहन

प्रशासन आणि स्थानिक संस्था यांच्या वतीने नागरिकांना धरण परिसरात फिरताना तसेच पाण्यात उतरताना योग्य ती खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. पोहण्यासाठी अधिकृत व सुरक्षित ठिकाणांचाच वापर करावा, मद्यपान करून पाण्यात उतरू नये तसेच समूहाने आणि आवश्यक सुरक्षासाधनांसहच पाण्यात उतरावे, असे आवाहन करण्यात आले आहे. निष्काळजीपणामुळे होणाऱ्या अशा दुर्घटना टाळण्यासाठी प्रत्येकाने जबाबदारीने वागणे गरजेचे असल्याचेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
view comments
मराठी बातम्या/पुणे/
पाण्याचा अंदाज चुकला अन् काळजाचा ठोका चुकला! पवना धरणात पोहताना तरुणाचा बुडून मृत्यू; मावळमध्ये हळहळ
Next Article
advertisement
आजपासून नवे नियम लागू, PM मोदींकडून मोठी घोषणा;  36 नव्हे आता 3 तासांत कारवाई, सरकारच्या नोटिफिकेशनने देशभरात चर्चा
आजपासून नवे नियम लागू, PM मोदींकडून मोठी घोषणा; 36 नव्हे आता 3 तासांत कारवाई
  • आजपासून नवे नियम लागू

  • सरकारचा मोठा निर्णय

  • नियम पाळले नाहीत तर होणार थेट कारवाई

View All
advertisement