पुण्यात पुन्हा भीषण अपघात, 2 सेकंदात दोघांचा भयंकर अंत, धडकी भरवणारा CCTV VIDEO
- Published by:Ravindra Mane
Last Updated:
Pune Accident News: पुणे शहरात पुन्हा एकदा भरधाव वेगामुळे भीषण अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. बंड गार्डन मेट्रो स्टेशनजवळ पहाटेच्या सुमारास एका भरधाव कारने मेट्रोच्या खांबाला जोरदार धडक दिली.
अभिजीत पोते, प्रतिनिधी पुणे: पुणे शहरात पुन्हा एकदा भरधाव वेगामुळे भीषण अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. पुणे शहरातील बंड गार्डन मेट्रो स्टेशनजवळ आज, रविवारी (दि. २ नोव्हेंबर २०२५) पहाटेच्या सुमारास एका भरधाव कारने मेट्रोच्या खांबाला जोरदार धडक दिली. हा अपघात इतका भीषण होता की, यात दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला असून, एक जण गंभीर जखमी झाला आहे. या संपूर्ण घटनेचा थरारक व्हिडीओ समोर आला असून सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
नेमका अपघात कसा झाला?
हा अपघात कोरेगाव पार्क परिसरातील बंड गार्डनर मेट्रो स्टेशनजवळ पहाटेच्या सुमारास झाला. अतिशय वेगात असलेली ही कार रस्त्यावरील डिव्हायडरला धडकून अनियंत्रित झाली आणि थेट मेट्रोच्या खांबावर जाऊन आदळली. धडक इतकी जोरदार होती की, कारचा चक्काचूर झाला. या अपघातात ऋतिक भंडारे आणि यश भंडारे या दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला, तर त्यांच्यासोबत असलेला एक मित्र गंभीर जखमी झाला आहे. जखमी तरुणावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
advertisement
अपघाताचा थरार CCTV मध्ये कैद
अपघातस्थळावरील सीसीटीव्ही फुटेज आता समोर आले आहे. या फुटेजमधून कारचा वेग किती भयानक होता, याचा अंदाज येतो. भरधाव वेगात असलेल्या कारवरील नियंत्रण सुटल्यामुळे हा अपघात झाल्याचे प्रथमदर्शनी दिसत आहे.
पुण्यातील बंडगार्डन मेट्रो स्टेशन परिसरात कारला भीषण अपघात, दोघांचा जागीच मृत्यू pic.twitter.com/FDxIe6nXh1
— News18Lokmat (@News18lokmat) November 2, 2025
advertisement
'ड्रिंक अँड ड्राईव्ह'ची शक्यता
कारचा वेग पाहता कार चालवणारे तरुण मद्यपान करून गाडी चालवत होते का? हा अपघात 'ड्रिंक अँड ड्राईव्ह' मुळे झाला आहे का? या दिशेने बंडगार्डन पोलीस तपास करत आहेत. सध्या पोलीस अपघाताचे नेमके कारण, कारचा वेग किती होता, तसेच मद्यप्राशनाचा या घटनेशी काही संबंध आहे का, याचा कसून तपास करत आहेत.
view commentsLocation :
Pune,Maharashtra
First Published :
November 02, 2025 12:03 PM IST


