Central Railway: अपघाताचा धोका कमी, सुस्साट वेगाची हमी, मध्य रेल्वेच्या या ट्रेनला LHB डबे, का आहेत खास?

Last Updated:

Central Railway: मध्य रेल्वेचा हा निर्णय प्रवाशांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देत रेल्वे सेवेला अधिक आधुनिक आणि विश्वासार्ह बनवण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे.

Central Railway: अपघाताचा धोका कमी, सुस्साट वेगाची हमी, मध्य रेल्वेच्या या ट्रेनला LHB डबे, का आहेत खास?
Central Railway: अपघाताचा धोका कमी, सुस्साट वेगाची हमी, मध्य रेल्वेच्या या ट्रेनला LHB डबे, का आहेत खास?
पुणे: प्रवाशांचा सुरक्षित आणि आरामदायी प्रवास सुनिश्चित करण्यासाठी मध्य रेल्वे प्रशासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. नवीन वर्षापासून मध्य रेल्वेच्या आठ महत्त्वाच्या एक्स्प्रेस गाड्यांमध्ये पारंपरिक ICF डब्यांच्या ऐवजी आधुनिक एलएचबी (Linke-Hofmann-Busch) डबे कायमस्वरूपी जोडण्यात येणार आहेत. पुण्यातून धावणाऱ्या अनेक गाड्यांचाही यात समावेश असून प्रवाशांना अधिक सुरक्षित, वेगवान आणि आरामदायी प्रवासाचा अनुभव मिळणार आहे.
मध्य रेल्वेच्या निर्णयानुसार छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस–चेन्नई एक्स्प्रेस (गाडी क्रमांक 22157/58), पुणे–वेरावल एक्स्प्रेस (11088/87), पुणे–भगत की कोठी एक्स्प्रेस (11090/89), पुणे–भुज एक्स्प्रेस (11092/91), पुणे–अहमदाबाद एक्स्प्रेस (22186/85), कोल्हापूर–नागपूर एक्स्प्रेस (11404/03), कोल्हापूर–हजरत निजामुद्दीन एक्स्प्रेस (12147/48) तसेच कोल्हापूर–अहमदाबाद एक्स्प्रेस (11050/49) या गाड्यांमध्ये एलएचबी कोच जोडले जाणार आहेत. 14 जानेवारी ते 25 जानेवारी 2026 या कालावधीत या सर्व गाड्या एलएचबी डब्यांसह धावण्यास सुरुवात करतील.
advertisement
LHB डब्यांचे वैशिष्ट्य?
एलएचबी डबे हे जर्मनीत विकसित आणि भारतात तयार होणारे आधुनिक स्टेनलेस स्टीलचे डबे असून त्यांच्या सुरक्षावैशिष्ट्यांमुळे हे डबे सध्या भारतीय रेल्वेची सर्वाधिक पसंतीची रचना ठरली आहेत. या डब्यांची अँटी-क्लाइंबिंग यंत्रणा अपघाताच्या वेळी एका डब्यावर दुसरा चढण्याची शक्यता कमी करते, तर अग्निरोधक साहित्यामुळे आग पसरण्याचा धोका मोठ्या प्रमाणावर कमी होतो. एलएचबी डब्यांचा कार्यरत वेग 160 किमी प्रतितास आणि रचना वेग 200 किमी प्रतितास असल्याने प्रवास अधिक वेगवान आणि सुरक्षित होतो.
advertisement
प्रवाशांच्या सुविधांच्या दृष्टीनेही हे डबे अत्याधुनिक आहेत. आरामदायी आसनव्यवस्था, एलईडी प्रकाश व्यवस्था, प्रत्येक प्रवाशासाठी उपलब्ध चार्जिंग सॉकेट्स, डिस्क ब्रेक्स, सहा तास बॅकअप असलेले आपत्कालीन प्रकाश आणि चार उघडता येणाऱ्या आपत्कालीन खिडक्या यामुळे प्रवास अधिक सोयीस्कर होतो. जुन्या ICF डब्यांच्या तुलनेत एलएचबी डब्यांमध्ये ध्वनी आणि कंपने कमी जाणवतात, ज्यामुळे लांब पल्ल्याचा प्रवासही अधिक सुखद होतो.
advertisement
मध्य रेल्वेचा हा निर्णय प्रवाशांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देत रेल्वे सेवेला अधिक आधुनिक आणि विश्वासार्ह बनवण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे. आगामी वर्षात रेल्वे प्रवाशांना अधिक सुरक्षित, आरामदायी आणि आधुनिक प्रवासाचा लाभ मिळणार आहे.
view comments
मराठी बातम्या/पुणे/
Central Railway: अपघाताचा धोका कमी, सुस्साट वेगाची हमी, मध्य रेल्वेच्या या ट्रेनला LHB डबे, का आहेत खास?
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement