Brain Pictures Photos : शस्त्रक्रियेतून कलेपर्यंतचा प्रवास, डॉ. जयदेव यांनी चित्रांतून उलगडलं मेंदूचं जग, सुंदर कलेचा Video
- Published by:Mohan Najan
- Reported by:Pooja Satyavan Patil
Last Updated:
पुण्यातील प्रसिद्ध न्यूरोसर्जन डॉ. जयदेव पंचवाघ यांनी मेंदूशस्त्रक्रियेदरम्यान पाहिलेल्या मेंदूतील आतील भागांवर आधारित चित्रकलेचा एक अनोखा संग्रह तयार केला आहे
पुणे: पुण्यातील प्रसिद्ध न्यूरोसर्जन डॉ. जयदेव पंचवाघ यांनी मेंदूशस्त्रक्रियेदरम्यान पाहिलेल्या मेंदूतील आतील भागांवर आधारित चित्रकलेचा एक अनोखा संग्रह तयार केला आहे. या चित्रप्रदर्शनातून ट्रायजेमिनल न्युराल्जिया आणि हेमीफेशियल स्पॅझमने त्रस्त रुग्णांसाठी निधी उभारण्यात आला आहे. याबाबत त्यांनी लोकल 18 ला अधिक माहिती दिली आहे.
डॉ. जयदेव पंचवाघ यांनी सांगितलं की, गेल्या 5 ते 6 वर्षांपासून त्यांनी चित्र काढण्यास सुरुवात केली आहे. मेंदूच्या शस्त्रक्रियेदरम्यान दिसणारे मेंदूचे आतील आणि महत्त्वाचे भाग सर्वसामान्यांना समजावेत, या उद्देशाने त्यांनी चित्र काढण्यास सुरुवात केली. आतापर्यंत त्यांनी 60 हून अधिक चित्रे काढली आहेत. शस्त्रक्रियेदरम्यान स्कल बेस ट्युमर, मायक्रोव्हॅस्क्युलर डिकम्प्रेशन, एन्युरिजम्स आणि इंट्राव्हेंट्रिक्युलर ट्युमर अशा कठीण प्रक्रियांमध्ये त्यांना मेंदूच्या खोल भागातील रचना त्यांनी चित्रकलेच्या माध्यमातून सगळ्यांपर्यंत पोहोचवली आहे.
advertisement
अलीकडेच मुंबईत झालेल्या आंतरराष्ट्रीय न्यूरोसर्जरी परिषदेत तसेच सप्टेंबर महिन्यात जर्मनीत त्यांच्या चित्रांचे प्रदर्शन झाले. या प्रदर्शनातील चित्रविक्रीतून ट्रायजेमिनल न्युराल्जिया आणि हेमीफेशियल स्पॅझमने त्रस्त रुग्णांसाठी निधी जमा करण्यात आला. या उपक्रमातून दुर्मिळ मेंदूविकारांबाबत जागरूकता निर्माण झाली असून, अनेक गरजू रुग्णांना आर्थिक मदत मिळाली असल्याचं त्यांनी सांगितलं.
view commentsLocation :
Pune,Maharashtra
First Published :
November 12, 2025 4:56 PM IST
मराठी बातम्या/पुणे/
Brain Pictures Photos : शस्त्रक्रियेतून कलेपर्यंतचा प्रवास, डॉ. जयदेव यांनी चित्रांतून उलगडलं मेंदूचं जग, सुंदर कलेचा Video

