Pune News: पुण्यात वाहतूक बदल; सिंहगड परिसरातील हा रस्ता दुरुस्तीसाठी पुढील 10 दिवस बंद
- Published by:Kiran Pharate
- local18
Last Updated:
पुणे जिल्हा प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, 4 डिसेंबर 2026 ते 15 डिसेंबर 2026 या कालावधीत हा रस्ता वाहतुकीसाठी अंशतः बंद ठेवण्यात येणार आहे.
पुणे : खेड-शिवापूर, कोंढणपूर आणि डोणजे या प्रमुख रस्त्यांवर वाहतुकीसाठी बंदी घालण्यात आली आहे. पुणे जिल्हा प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, 4 डिसेंबर 2026 ते 15 डिसेंबर 2026 या कालावधीत हा रस्ता वाहतुकीसाठी अंशतः बंद ठेवण्यात येणार आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर आयोजित करण्यात आलेल्या 'पुणे ग्रँड चॅलेंज टूर 2026' या सायकलिंग स्पर्धेच्या तयारीसाठी आणि मार्गावरील रस्त्यांची दुरुस्ती आणि डागडुजी करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
जागतिक स्पर्धेसाठी रस्ते दुरुस्ती
पुणे ग्रँड चॅलेंज टूर 2026 ही जागतिक दर्जाची सायकलिंग स्पर्धा जानेवारी 2026 मध्ये होणार आहे. या स्पर्धेचा मार्ग पुणे जिल्ह्यातील मुळशी, भोर, वेल्हा आणि पुरंदर या महत्त्वपूर्ण तालुक्यांमधून जातो. स्पर्धेसाठी हा मार्ग सुस्थितीत असणे आवश्यक असल्याने, मार्गावरील रस्त्यांची तातडीने दुरुस्ती आणि आवश्यक डागडुजी करण्यात येणार आहे.
या कामामुळे खेडशिवापूर-कोंढणपूर-डोणजे/सिंहगड घाटरस्त्याचा वापर करणाऱ्या स्थानिक नागरिकांची आणि पर्यटकांची गैरसोय होऊ शकते. त्यामुळे वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी आणि कोणताही अपघात टाळण्यासाठी राजगड पोलिसांनी वाहनचालकांना पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे आवाहन केले आहे.
advertisement
प्रवासासाठी बाहेर पडण्यापूर्वी नागरिकांनी रस्त्याच्या स्थितीची माहिती घ्यावी आणि १५ डिसेंबर पर्यंत या मार्गावर प्रवास करणे टाळावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
view commentsLocation :
Pune,Maharashtra
First Published :
December 07, 2025 8:04 AM IST
मराठी बातम्या/पुणे/
Pune News: पुण्यात वाहतूक बदल; सिंहगड परिसरातील हा रस्ता दुरुस्तीसाठी पुढील 10 दिवस बंद


