पुण्यातील सदाशिव पेठेत अग्नितांडव, टेरेससह दुकानं जळून खाक, ५ अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल
- Published by:Kranti Kanetkar
Last Updated:
अग्निशमन दलाच्या ५ गाड्या सध्या घटनास्थळी असून, आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही,
अभिजित पोते, प्रतिनिधी पुणे: शहरातील गजबजलेल्या सदाशिव पेठ परिसरात असलेल्या रमेश डायिंग दुकानाला भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. प्राथमिक माहितीनुसार, ही आग दुकानाच्या टेरेसवर आणि दुकानाच्या आतील भागात पसरली आहे. आगीच्या ज्वाळा मोठ्या असल्याने, याची माहिती मिळताच पुणे अग्निशमन दलाच्या गाड्या तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या.
अग्निशमन दलाच्या ५ गाड्या सध्या घटनास्थळी असून, आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही, परंतु दुकानातील सामानाचे मोठे नुकसान झाले असण्याची भीती व्यक्त होत आहे. आग लागण्याचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट असून, अग्निशमन दलाकडून आग विझवल्यानंतर या संदर्भात अधिक तपास केला जाईल.
Location :
Pune Cantonment (Pune Camp),Pune,Maharashtra
First Published :
December 09, 2025 12:17 PM IST
मराठी बातम्या/पुणे/
पुण्यातील सदाशिव पेठेत अग्नितांडव, टेरेससह दुकानं जळून खाक, ५ अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल


