कामगारावर कोयत्याने हल्ला करून 4 लाखांची चोरी, पोलिसांनी थरारक लूटमारीचा काही तासांतच केला पर्दाफाश
- Published by:Kiran Pharate
- local18
Last Updated:
श्रीजी सिरॅमिक या दुकानातील कामगार आशिष अरजनभा बुवा हे दुकानाची तीन लाख ८० हजार रुपयांची रोकड असलेली बॅग घेऊन बाहेर पडले. ते दुकानाबाहेर थांबलेले असतानाच, चार संशयितांनी त्यांच्यावर अचानक कोयत्याने हल्ला चढवला
पिंपरी : चिंचवड येथे कामगारावर कोयत्याने हल्ला करून तब्बल तीन लाख ८० हजार रुपयांची रोकड लुटण्यात आली होती. या प्रकरणी आता चार जणांच्या टोळीला पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या गुंडाविरोधी पथकाने अवघ्या काही तासांत अटक केली आहे. पोलिसांनी मोठ्या धाडसाने गुन्ह्याचा छडा लावला आहे. लुटीसाठी टीप देणाऱ्या कामगाराचाही या टोळीत समावेश असल्याचे तपासात उघड झाले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी (२ डिसेंबर) रात्री ९ वाजून ५० मिनिटांनी चिंचवडमधील केशवनगर परिसरात ही घटना घडली. श्रीजी सिरॅमिक या दुकानातील कामगार आशिष अरजनभा बुवा हे दुकानाची तीन लाख ८० हजार रुपयांची रोकड असलेली बॅग घेऊन बाहेर पडले. ते दुकानाबाहेर थांबलेले असतानाच, चार संशयितांनी त्यांच्यावर अचानक कोयत्याने हल्ला चढवला आणि त्यांच्याकडील रोकड असलेली बॅग हिसकावून पोबारा केला.
advertisement
या गंभीर गुन्ह्याची माहिती मिळताच गुन्हे शाखेच्या गुंडाविरोधी पथकाने समांतर तपास सुरू केला. सहायक पोलीस निरीक्षक हरीश माने यांच्या पथकाने तातडीने सीसीटीव्ही फुटेज, खबऱ्यांकडून मिळालेली माहिती आणि तांत्रिक तपास या त्रिसूत्रीच्या आधारे तपासचक्र फिरवले. त्यांनी थेरगाव परिसरातून संशयितांना ताब्यात घेतले.
advertisement
यश रमेश अंधारे (वय १८, रा. थेरगाव), रितेश मुकेश चव्हाण (वय १८, रा. थेरगाव), रूपेंद्र रूपबसंत बैद (वय १९, रा. पिंपरी) आणि एका विधिसंघर्षित बालकास पोलिसांनी ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान, या तिघांनीही गुन्ह्याची कबुली दिली.
पोलिस उपायुक्त डॉ. शिवाजी पवार आणि सहआयुक्त डॉ. विशाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक हरीश माने, उपनिरीक्षक समीर लोंढे, प्रवीण तापकीर, विक्रम जगदाळे, अमित गायकवाड, गणेश मेदगे, गंगाराम चव्हाण यांच्या पथकाने ही कौतुकास्पद कामगिरी केली.
view commentsLocation :
Pune,Maharashtra
First Published :
December 07, 2025 9:20 AM IST
मराठी बातम्या/पुणे/
कामगारावर कोयत्याने हल्ला करून 4 लाखांची चोरी, पोलिसांनी थरारक लूटमारीचा काही तासांतच केला पर्दाफाश


