Nakul Bhoir Murder: बॉयफ्रेंडला वाचवण्यासाठी पिंपरीच्या भावी नगरसेविकेची धडपड, पण घामाच्या वासाने फुटलं प्रेमाच्या त्रिकोणाचे बिंग
- Published by:Prachi Amale
Last Updated:
Nakul Bhoir Murder: नकुलच्या हत्येनंतर चैताली प्रियकराला वाचवण्यासाठी पोलिसांची दिशाभूल करत होती.
पुणे : पिंपरी चिंचवडमध्ये सामाजिक कार्यकर्ते नकुल भोईर यांच्या हत्येत नवा ट्विस्ट आला आहे. पत्नी चैताली हिने प्रियकर सिद्धार्थ दीपक पवार याच्या मदतीने हत्या केल्याचं चिंचवड पोलिसांच्या तपासात निष्पन्न झालं आहे.एका ओढणीमुळे नकुल भोईर हत्याकांडात मोठा उलगडा झाला आहे. चैतालीने तिचा प्रियकर सिद्धार्थ दीपक पवार याला सोबत घेऊन नकुलची हत्या केल्याचं उघड झालं आहे.
नकुलच्या हत्येला आठवडा उलटला तरी प्रियकर सिद्धार्थ पवार याचा मोबाइल फोन अद्याप मिळून आलेला नाही. त्यातून गुन्ह्याशी संबंधित महत्त्वपूर्ण माहिती आणि पुरावे मिळण्यास मदत होईल, त्यामुळे मोबाइल फोन हस्तगत करण्यासाठी पोलिस कोठडीत वाढ करण्यात यावी, असे पोलिसांनी न्यायालयात सांगितले. त्यानुसार न्यायालयाने चैताली आणि सिद्धार्थ या दोघांच्या पोलिस कोठडीत रविवारपर्यंत (दि. २ नोव्हेंबर) वाढ केली.
advertisement
प्रियकराला वाचवण्यासाठी पत्नीची धडपड
चैतालीने नकुलच्या हत्येचा कट रचला आणि प्रियकराच्या मदतीने तिने नकुलचा जीव घेतला. चिंचवड पोलिसांच्या तपासाने हत्येच्या घटनेमागील सत्य समोर आलं असून, या प्रकरणी पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे. महत्त्वाचे म्हणजे सिद्धार्थ-चैतालीच्या प्रेमसंबंधावरून नकुलशी वाद होत होते. प्रेमसंबंधाच्या आड येत असल्याने दोघांनी नकुलला कायमचं संपवण्याचा निर्णय घेतला. ज्या दिवशी हत्या झाली त्या दिवशी कुलने तिला मारहाण केली. तिला मारहाण झाल्याने प्रियकर सिद्धार्थचा राग अनावर झाला. दोघांनी संगनमताने ओढणीने नकुलचा गळा आवळून खून केला.
advertisement
ओढणीला येत होता घामाचा वास
नकुलच्या हत्येनंतर चैताली प्रियकराला वाचवण्यासाठी पोलिसांची दिशाभूल करत होती. मात्र ज्या ओढणीने नकुलला ठार मारलं त्याच ओढणीमुळे सत्य समोर आलं आहे. चैताली आणि तिचा प्रियकर दोघांनी मिळून नकुल यांचा गळा ओढणीने आवळून संपवलं. यानंतर सिद्धार्थ त्या ओढणीला जाळून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न करत होता, कारण त्यावर नकुलच्या घामाचा वास आणि पुरावे होते. एवढचं नाही तर चैतालीने पोलिसांना दिशाभूल करण्यासाठी दुसरी ओढणी दाखवली. परंतु तपासात मूळ ओढणीबाबत सत्य समोर आलं. पोलिसांनी ती ओढणी जप्त केली आहे.
advertisement
पत्नीला नगरसवेक करण्याच्या तयारीत
मृत नकुल भोईर हा पत्नीला नगरसेवक बनवण्याच्या तयारीत होता. नकुलचा सामाजिक कार्यामध्ये मोठा वाटा होता, मराठा क्रांती मोर्चाच्या अनेक उपक्रमामध्ये तो जिकरीने सहभाग घ्यायचा अनेक संघटनांची देखील त्याचे संबंध राजकीय नेत्यांशी देखील त्याचे जवळचे संबंध होते, सामाजिक कार्याचा वारसापुढे चालवण्यासाठी त्याने आपल्या पत्नीला नगरसेवक बनवायचे ठरवलं होते यासाठी आगामी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या निवडणुकीमध्ये तो त्याच्या पत्नीला उभे देखील करणार होता. त्या अगोदरच चैतालीने पतीला संपवलं.
view commentsLocation :
Pune,Maharashtra
First Published :
November 02, 2025 4:13 PM IST
मराठी बातम्या/पुणे/
Nakul Bhoir Murder: बॉयफ्रेंडला वाचवण्यासाठी पिंपरीच्या भावी नगरसेविकेची धडपड, पण घामाच्या वासाने फुटलं प्रेमाच्या त्रिकोणाचे बिंग


