चिखली पोलिसांची तत्परता! गहाळ झालेलं लाखो रूपयांचं सोन्याचं मंगळसूत्र अवघ्या काही तासात 'असं' शोधलं
- Published by:Kiran Pharate
- local18
Last Updated:
वाटेत पाण्याच्या टाकीसमोरील रस्त्यावरून जात असताना पर्समधून हे मंगळसूत्र निसटलं आणि रस्त्यावर पडून गहाळ झालं.
पिंपरी-चिंचवड: घाम गाळून कमावलेले दागिने गहाळ झाले की मालकाची होणारी घालमेल ओळखून चिखली पोलिसांनी अत्यंत कौतुकास्पद कामगिरी केली आहे. बाजारात जाताना गहाळ झालेले दीड तोळ्याचं सुमारे दीड लाख किमतीचं सोन्याचं मंगळसूत्र पोलिसांनी तांत्रिक तपासाच्या आधारे शोधून काढून संबंधित महिलेला सुखरूप परत केलं आहे.
नेमकी घटना काय?
मिळालेल्या माहितीनुसार, चिखलीतील पाटीलनगर भागात राहणाऱ्या आश्लेषा राजाराम काळे (वय ३४) या ३० नोव्हेंबर रोजी घरगुती सामानासाठी बाजारात जात होत्या. त्यांनी आपलं सोन्याचं मंगळसूत्र गळ्यात न घालता पर्समध्ये ठेवलं होतं. मात्र, वाटेत पाण्याच्या टाकीसमोरील रस्त्यावरून जात असताना पर्समधून हे मंगळसूत्र निसटलं आणि रस्त्यावर पडून गहाळ झालं. घरी आल्यानंतर मंगळसूत्र पर्समध्ये नसल्याचं लक्षात येताच काळे कुटुंबीयांची मोठी धावपळ झाली.
advertisement
आश्लेषा यांचे पती राजाराम काळे यांनी तत्काळ चिखली पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार नोंदवली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठल साळुंखे यांनी तपास पथकाला तातडीने सूचना दिल्या. सहायक पोलीस निरीक्षक राम गोमारे आणि त्यांच्या पथकाने परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची कसून तपासणी केली.
advertisement
सीसीटीव्ही फुटेज ठरले निर्णायक
view commentsतपासादरम्यान सीसीटीव्ही फुटेजमध्ये एक महिला रस्त्यावर पडलेली वस्तू उचलताना दिसली. पोलिसांनी तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे त्या महिलेचा शोध घेतला. पोलिसांनी संबंधित महिलेशी संपर्क साधला. अखेर खातरजमा केल्यानंतर पोलिसांनी आश्लेषा काळे यांना पोलीस ठाण्यात बोलावून त्यांचं मौल्यवान मंगळसूत्र सुपूर्द केलं. हरवलेला ऐवज सुखरूप परत मिळाल्यानं काळे कुटुंबीयांनी चिखली पोलिसांचे मनापासून आभार मानले आहेत.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
December 07, 2025 12:19 PM IST
मराठी बातम्या/पुणे/
चिखली पोलिसांची तत्परता! गहाळ झालेलं लाखो रूपयांचं सोन्याचं मंगळसूत्र अवघ्या काही तासात 'असं' शोधलं


