Pune Crime : घरबसल्या ऑनलाइन कामाचं आमिष; पुण्यातल्या तरुणीनं विश्वासही ठेवला, पण झाला मोठा 'गेम'
- Published by:Kiran Pharate
- local18
Last Updated:
घरी बसून ऑनलाइन पद्धतीने काम करण्याची संधी देण्याचे आमिष दाखवून सायबर चोरट्यांनी एका तरुणीला 12 लाख 15 हजार रुपयांना फसवले आहे.
पुणे : पुणे शहरात सायबर चोरट्यांनी गुंतवणुकीचे आमिष दाखवून एकाच दिवसात दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये 39 लाखांहून अधिक रुपयांची फसवणूक केल्याचे प्रकार उघडकीस आले आहेत. शेअर बाजारात आणि ऑनलाइन टास्कच्या नावाखाली नागरिकांना लक्ष्य केलं जात आहे.त्यामुळे, तुम्हालाही कोणी घरी बसून ऑनलाइन पद्धतीने काम असल्याचं सांगून फसवणूक करण्याचा प्रयत्न केला, तर आधीच सावध व्हा.
ऑनलाइन टास्कच्या नावाखाली तरुणीला १२ लाखांना फसवले
पहिल्या घटनेत, घरी बसून ऑनलाइन पद्धतीने काम करण्याची संधी देण्याचे आमिष दाखवून सायबर चोरट्यांनी एका तरुणीला 12 लाख 15 हजार रुपयांना फसवले आहे. तरुणीच्या मोबाईल क्रमांकावर संदेश पाठवून चोरट्यांनी तिला आकर्षक परताव्याचे आश्वासन दिले. सुरुवातीला काही रक्कम परतावा म्हणून देऊन चोरट्यांनी तिचा विश्वास संपादन केला. त्यानंतर तिला ऑनलाइन टास्कमध्ये मोठी रक्कम गुंतवण्यास सांगण्यात आले. पैसे गुंतवल्यानंतर मात्र तिला कोणताही परतावा न मिळाल्याने आपली फसवणूक झाल्याचे तिच्या लक्षात आले. याप्रकरणी विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून वरिष्ठ पोलीस निरीक्षक मंगेश हांडे अधिक तपास करत आहेत.
advertisement
शेअरमध्ये गुंतवणुकीच्या नावाखाली २७ लाखांचा गंडा
view commentsदुसऱ्या एका घटनेत खडकी (रेंजहिल्स) परिसरात राहणाऱ्या एका व्यक्तीची शेअर बाजारात जास्त परतावा मिळवून देण्याचे आमिष दाखवून फसवणूक करण्यात आली. या व्यक्तीची २७ लाख ४१ हजार रुपयांची फसवणूक झाली आहे. सायबर चोरट्यांनी त्यांच्या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधून त्यांना शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवण्यास प्रवृत्त केले. चांगला परतावा मिळेल या आशेने फिर्यादीने वेळोवेळी चोरट्यांच्या बँक खात्यात मोठी रक्कम जमा केली. मात्र, परतावा न मिळाल्याने फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी खडकी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक विक्रमसिंग कदम या प्रकरणाचा तपास करत आहेत.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
November 29, 2025 11:51 AM IST
मराठी बातम्या/पुणे/
Pune Crime : घरबसल्या ऑनलाइन कामाचं आमिष; पुण्यातल्या तरुणीनं विश्वासही ठेवला, पण झाला मोठा 'गेम'


