Pune News: कोथरूडमध्ये श्वान मालकांवर कारवाईचा बडगा! या नियमाचं उल्लंघन करणाऱ्यांकडून 5 हजारांचा दंड वसूल

Last Updated:

कोथरूड परिसरात सार्वजनिक स्वच्छतेबाबत जनजागृती करण्यासाठी क्षेत्रीय कार्यालयाने विशेष मोहीम हाती घेतली आहे.

श्वान मालकांवर कारवाई (प्रतिकात्मक फोटो)
श्वान मालकांवर कारवाई (प्रतिकात्मक फोटो)
पुणे: पुणे महापालिकेच्या स्वच्छ भारत अभियान आणि आगामी स्वच्छ सर्वेक्षण २०२५-२६ च्या पार्श्वभूमीवर नुकतीच कारवाई करण्यात आली आहे. कोथरूड-बावधन क्षेत्रीय कार्यालयाच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाने नियमांचे उल्लंघन करणाऱ्या श्वान मालकांवर दंडात्मक कारवाई केली आहे. सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता करणाऱ्या १० श्वान मालकांकडून प्रत्येकी ५०० रुपये दंड आकारण्यात आला आहे. अशी मिळून एकूण पाच हजार रुपयांची वसुली करण्यात आली आहे.
'पूप स्कूप' वापरा, अन्यथा दंड भरा
कोथरूड परिसरात सार्वजनिक स्वच्छतेबाबत जनजागृती करण्यासाठी क्षेत्रीय कार्यालयाने विशेष मोहीम हाती घेतली आहे. ही मोहीम सकाळच्या वेळी डहाणूकर कॉलनी, कोथरूड गावठाण आरोग्य कोठी, लेन क्रमांक १०, १३, कमिन्स रस्ता, गोपीनाथ नगर, कुमार परिसर, एकलव्य कॉलेज परिसर, आशिष गार्डन डी. पी. रस्ता आणि गाढवे कॉलनी यांसारख्या प्रमुख भागांमध्ये राबविण्यात आली.
advertisement
या मोहिमेदरम्यान, श्वान मालकांना त्यांच्या पाळीव श्वानांनी केलेल्या विष्ठेची योग्य विल्हेवाट लावण्यासाठी 'पूप स्कूप' वापरण्याचे आणि सार्वजनिक ठिकाणे स्वच्छ ठेवण्याचे आवाहन कर्मचाऱ्यांनी केले. अनेक श्वान मालकांना प्रत्यक्ष भेटून, नियमांचे महत्त्व समजावून सांगण्यात आले.
या कारवाईदरम्यान, जे श्वान मालक नियम मोडताना आढळले, त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात आली. विशेष म्हणजे, कारवाई करताना काही श्वान मालकांनी कर्मचाऱ्यांशी वाद घालण्याचा प्रयत्न केला. अशावेळी महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी त्यांच्याशी हुज्जत न घालता, त्यांना गुलाबपुष्प देऊन गांधीगिरीच्या माध्यमातून शांतपणे नियमांचे पालन करण्याचे महत्त्व समजावले.
advertisement
महापालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता करणाऱ्या नागरिकांवर यापुढेही अशीच कडक कारवाई सुरू राहील आणि शहर स्वच्छ ठेवण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे.
view comments
मराठी बातम्या/पुणे/
Pune News: कोथरूडमध्ये श्वान मालकांवर कारवाईचा बडगा! या नियमाचं उल्लंघन करणाऱ्यांकडून 5 हजारांचा दंड वसूल
Next Article
advertisement
Eknath Shinde Ravindra Chavan: व्यासपीठावर केमिस्ट्री दिसली पण भाषणात सूर जुळेना, शिंदे-चव्हाण एकाच मंचावर, नेमकं घडलं काय?
व्यासपीठावर केमिस्ट्री पण भाषणात सूर जुळेना, शिंदे-चव्हाण एकाच मंचावर, घडलं काय
  • व्यासपीठावर केमिस्ट्री पण भाषणात सूर जुळेना, शिंदे-चव्हाण एकाच मंचावर, घडलं काय

  • व्यासपीठावर केमिस्ट्री पण भाषणात सूर जुळेना, शिंदे-चव्हाण एकाच मंचावर, घडलं काय

  • व्यासपीठावर केमिस्ट्री पण भाषणात सूर जुळेना, शिंदे-चव्हाण एकाच मंचावर, घडलं काय

View All
advertisement