Pune News : जुबेरच्या लॅपटॉपमध्ये आक्षेपार्ह फाईल्स, अल कायदा सोबत करायचा काम,न्यायालयीन कोठडीत रवानगी
- Published by:Prashant Gomane
Last Updated:
पुण्याच्या एटीएसने ताब्यात घेतलेल्या जुबेर हंगरगेकर हा अल कायदा या जागतिक दहशतवादी संघटनेसाठी काम करत असल्याच्या संशयातून त्याला अटक करण्यात आली होती. पण आता हा संशय खरा ठरला आहे.
Pune News : अभिजीत पोते,प्रतिनिधी पुणे : पुण्याच्या एटीएसने ताब्यात घेतलेल्या जुबेर हंगरगेकर हा अल कायदा या जागतिक दहशतवादी संघटनेसाठी काम करत असल्याच्या संशयातून त्याला अटक करण्यात आली होती. पण आता हा संशय खरा ठरला आहे.त्याचसोबत त्याच्या लॅपटॉपमध्ये आक्षेपार्ह फाईल्स आढळल्या आहे. विशेष म्हणजे त्याच्या लॅपटॉप मध्ये १ टीबी पेक्षा अधिक डेटा असल्याची माहिती समोर आली आहे.या सगळ्या गोष्टी पाहता आता त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आहे.
जुबेर हंगरगेकर याच्या लॅपटॉप मध्ये १ टीबी पेक्षा अधिक डेटा आढळला आहे. तसेच हंगरगेकरच्या मोबाईल आणि लॅपटॉप मधील आक्षेपार्ह फाइल्सची तपासणी सुरू आहे. लॅपटॉप मधील फाईल्स च्या विश्लेषणातून सबळ पुरावे गोळा करण्याचे काम ए टी एस कडून सुरू आहे.
अल कायदा या जागतिक दहशतवादी संघटनेसाठी काम करत असलेल्या जुबेर हंगरगेकरची रवानगी विशेष न्यायालयाने न्यायालयीन कोठडीत केली आहे. न्यायालयाने जुबेरच्या पोलिस कोठडीचा हक्क अबाधित ठेवून त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत केली आहे.
advertisement
अल कायदा इन इंडियन सबकाँटिनेन्ट (एक्यूआयएस) या दहशतवादी संघटनेच्या समर्थनार्थ जिहादचा प्रसार-प्रचार करून देशाच्या एकता व सुरक्षिततेला धोका निर्माण केल्याच्या आरोपावरून जुबेर इलियास हंगरगेकर अटक करण्यात आली होती.
चौकशीत धक्कादायक माहिती समोर
view commentsजुबेर हंगरगेकर अटक केल्यानंतर त्याच्या काही साथीदाराने संशयित पुस्तक प्रमाणपत्र कागदपत्र गोळा करून जाळली होती. काळेपडळ परिसरातील मदरशाच्या मोकळ्या जागेत ही कागदपत्र जाळण्याचे तपासात समोर आले होते. जुबेर चे काही साथीदार सीमेचे जुने सदस्य आहेत तर जुबेर च्या कॉन्टॅक्ट लिस्ट मध्ये पाच जण परदेशातील व्यक्तीचे नंबर आहेत. पाकिस्तान सौदी अरेबिया कुवेत ओमान मधील पाच व्यक्तीचे संपर्क क्रमांक आहेत.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
November 14, 2025 11:40 PM IST
मराठी बातम्या/पुणे/
Pune News : जुबेरच्या लॅपटॉपमध्ये आक्षेपार्ह फाईल्स, अल कायदा सोबत करायचा काम,न्यायालयीन कोठडीत रवानगी


