Pune Railway : इंडिगोच्या गोंधळामुळे प्रवाशी हैराण; मदतीला धावली रेल्वे, पुणे स्टेशनवरून या शहरांसाठी विशेष गाड्या
- Published by:Kiran Pharate
- local18
Last Updated:
प्रवाशांच्या गरजेनुसार आणखी गाड्यांचे नियोजन केले जात आहे. मध्य रेल्वेने नागपूर, मुंबई, पुणे या मार्गांवरून विशेष गाड्यांचे वेळापत्रक जाहीर केले आहे.
पुणे : इंडिगो एअरलाईन्सच्या विस्कळीत वेळापत्रकामुळे हवाई प्रवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. आता या प्रवाशांनी रेल्वे सेवेकडे धाव घेतली आहे. प्रवाशांकडून जादा गाड्या सोडण्याची वाढती मागणी लक्षात घेऊन, पुणे रेल्वे प्रशासनाने तातडीने विशेष गाड्या सोडल्या आहेत. बेंगळुरू आणि दिल्ली या दोन महत्त्वाच्या शहरांसाठी वातानुकूलित (AC) आणि आरामदायी प्रवास असलेल्या अतिरिक्त रेल्वे गाड्या चालवण्याचे नियोजन केले आहे.
विमानांचे उड्डाण विलंबाने होत आहे. तर, इतर विमान कंपन्या तिकीट दरांमध्ये अवाजवी वाढ करून प्रवाशांची अडवणूक करत आहेत. यामुळे कंपन्यांच्या कामासाठी निघालेले कर्मचारी, परीक्षार्थी विद्यार्थी तसेच उपचारांसाठी प्रवास करणारे रुग्ण नियोजित ठिकाणी वेळेत पोहोचण्यासाठी धावपळ करत आहेत. अशा अनेक त्रस्त प्रवाशांनी रेल्वे प्रशासनाकडे जादा गाड्या सोडण्याची मागणी केली होती.
advertisement
मध्य रेल्वे, पुणे विभागाचे जनसंपर्क अधिकारी हेमंतकुमार बेहरा यांनी दिलेल्या माहितीनुसार, हिवाळी सत्रानुसार दरवर्षी जादा गाड्या सोडण्याचे नियोजन असतेच. परंतु यंदाच्या अचानक वाढलेल्या मागणीमुळे तातडीने दोन विशेष गाड्या सोडण्यात आल्या आहेत. यानुसार, पुणे ते बेंगळुरू ही रेल्वे शनिवार, ६ डिसेंबर रोजी रात्री सात वाजता आणि पुणे ते हजरत निजामुद्दीन (दिल्ली) ही दुसरी रेल्वे रविवार, ७ डिसेंबर रोजी रात्री ८ वाजून २० मिनिटांनी सोडण्यात येणार आहे.
advertisement
प्रवाशांच्या गरजेनुसार आणखी गाड्यांचे नियोजन केले जात आहे. मध्य रेल्वेने नागपूर, मुंबई, पुणे या मार्गांवरून विशेष गाड्यांचे वेळापत्रक जाहीर केले आहे. तसेच, मडगाव, नागपूर, बेंगळुरू, लखनौ, गोरखपूर आणि हजरत निजामुद्दीन (दिल्ली) या प्रमुख स्थळांना जोडणाऱ्या अनेक फेऱ्या असलेल्या विशेष गाड्याही सोडण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
view commentsLocation :
Pune,Maharashtra
First Published :
December 07, 2025 7:04 AM IST
मराठी बातम्या/पुणे/
Pune Railway : इंडिगोच्या गोंधळामुळे प्रवाशी हैराण; मदतीला धावली रेल्वे, पुणे स्टेशनवरून या शहरांसाठी विशेष गाड्या


