आता महामार्गावर लागणार QR कोडचे होर्डिंग्ज, कुणाला आणि कसा फायदा? A टू Z माहिती
- Published by:Shankar Pawar
- Reported by:Pooja Satyavan Patil
Last Updated:
राज्यातील महामार्गांवरून प्रवास करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. आता महामार्गावर QR कोडचे होर्डिंग्ज लावण्यात येणार आहेत.
पुणे : प्रवाशांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. केंद्र सरकारने देशातील राष्ट्रीय महामार्गांवर क्यूआर कोड असलेली होर्डिंग्ज लावण्याचा निर्णय घेतला आहे. लवकरच देशभरातील सर्व महामार्गांवर ही होर्डिंग्ज बसवली जाणार आहेत. या क्यूआर कोड स्कॅन केल्यानंतर प्रवाशांना संबंधित महामार्गाचा क्रमांक, किलोमीटर अंतर, गस्त घालणाऱ्या पथकाचे संपर्क क्रमांक, टोल व्यवस्थापक आणि रेसिडेंट इंजिनिअर यांची माहिती मिळणार आहे. तसेच आपत्कालीन परिस्थितीत मदतीसाठी 1033 हा हेल्पलाइन क्रमांकही तत्काळ पाहता येणार आहे.
पुणे जिल्ह्यातून सध्या चार राष्ट्रीय महामार्ग आणि काही राज्य मार्ग जातात. त्यामुळे क्यूआर कोड प्रणालीचा फायदा जिल्ह्यातील नागरिकांना मोठ्या प्रमाणात होणार आहे. या नव्या उपक्रमामुळे प्रवासादरम्यान मदत मिळवणे अधिक सोपे होईल, तसेच महामार्गावरील सुरक्षा व्यवस्थेतही सुधारणा होणार आहे.
advertisement
क्यूआर कोडची होर्डिंग्ज कुठे लावणार?
प्रवाशांना हे क्यूआर कोड सहज दिसावेत यासाठी टोल प्लाझा, विश्रांतीस्थळे, ट्रक ले-बाय क्षेत्रे तसेच महामार्गाच्या सुरुवातीच्या आणि शेवटच्या ठिकाणी ही होर्डिंग्ज बसवली जाणार आहेत. या डिजिटल उपक्रमामुळे महामार्गावरील प्रवास अधिक सोयीस्कर होईल. आपत्कालीन परिस्थितीत प्रवाशांना तत्काळ मदत मिळू शकेल, तसेच संबंधित कंत्राटदार आणि अधिकाऱ्यांची माहितीही या कोडमधून पाहता येणार आहे.
advertisement
एकाच स्कॅनवर सर्व माहिती उपलब्ध
view commentsमहामार्गावरून प्रवास करणाऱ्या नागरिकांना आता मार्गावरील जवळची रुग्णालये, पेट्रोलपंप, रेस्टॉरंट, पोलिस ठाणे, वाहन दुरुस्तीची केंद्रे आणि इलेक्ट्रिक वाहन चार्जिंग स्टेशन्स यांची माहितीही मिळणार आहे. त्यामुळे प्रवाशांना प्रवासादरम्यान आवश्यक सेवा शोधणे अधिक सोपे होणार आहे. तसेच आपत्कालीन परिस्थितीत मदतही लवकर उपब्धत होणार आहे.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
November 12, 2025 12:44 PM IST


