Pune Traffic Update : पुणेकरांनो लक्ष द्या! मार्केटयार्ड परिसरात वाहतूक बदल, या पर्यायी मार्गाचा करा वापर
- Published by:Mohan Najan
- Reported by:Prachi Balu Kedari
Last Updated:
डॉ. बाबा आढाव यांच्या अंत्यदर्शनासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी होण्याची शक्यता असून वाहतूक विभागाने पर्यायी मार्गाचा वापर करण्याचा सल्ला दिला आहे.
पुणे : समाजवादी विचारांचे ज्येष्ठ नेते, मानवतावादी चिंतक आणि असंघटित कामगारांच्या हक्कांसाठी आयुष्यभर लढा देणारे डॉ. बाबा आढाव यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन (9 डिसेंबर) सकाळी 10 ते सायंकाळी 5 या वेळेत मार्केटयार्ड येथील हमाल भवन येथे ठेवण्यात येणार आहे. त्यांच्या कार्याची व्याप्ती आणि जनमानसातील आदर लक्षात घेता या ठिकाणी मोठ्या प्रमाणात नागरिक, कामगार, सामाजिक कार्यकर्ते आणि विविध संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे परिसरात मोठी गर्दी आणि वाहतूक कोंडी होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
बाबा आढाव यांनी रिक्षाचालक, हमाल, माथाडी, फेरीवाले, बांधकाम मजूर, बाजार समित्यांतील कामगार अशा असंघटित श्रमिकांना संघटित करून त्यांच्या हक्कांसाठी निर्णायक लढे उभे केले. माथाडी आणि इतर हातगाडी कामगार कल्याण मंडळ साकारण्यात त्यांचे नेतृत्व महत्त्वपूर्ण ठरले. त्यांच्या अंत्यदर्शनासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी होण्याची शक्यता असून वाहतूक विभागाने पर्यायी मार्गाचा वापर करण्याचा सल्ला दिला आहे.
advertisement
अंत्यदर्शनासाठी होणाऱ्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर वाहतूक शाखा, पुणे शहर यांनी नागरिकांना पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन केले आहे. शिवनेरी रोड आणि मार्केटयार्ड परिसरातील मुख्य रस्त्यांचा शक्यतो वापर टाळावा, असे पोलिसांनी सांगितले.
पर्यायी मार्ग
1. गंगाधाम चौक – नेहरू रोड – सेवन लव्ह चौक मार्गे आवश्यक ठिकाणी प्रवास.
advertisement
2. गंगाधाम चौक – चांद्रलोक चौक – सातारा रोड मार्गे इच्छित स्थळी पोहोचता येईल.
पोलीस अधिकाऱ्यांनी वाहतूक नियंत्रणासाठी विशेष पथके तैनात केली असून नागरिकांनी सहकार्य करून वाहतूक सुरळीत ठेवावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
view commentsLocation :
Pune,Maharashtra
First Published :
December 09, 2025 6:52 AM IST
मराठी बातम्या/पुणे/
Pune Traffic Update : पुणेकरांनो लक्ष द्या! मार्केटयार्ड परिसरात वाहतूक बदल, या पर्यायी मार्गाचा करा वापर


