महाराष्ट्र देशा! इथं मुस्लिमांसोबत एकत्र येऊन हिंदू साजरा करता उरूस, 350 वर्षांची परंपरा!
- Published by:Mohan Najan
- Reported by:Priti Nikam
Last Updated:
पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठी यात्रा म्हणून सांगलीच्या इस्लामपूर शहरातील 'संभूआप्पा-बुवाफन उरुस' ओळखला जातो. हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतीक असलेल्या या उत्सवाला सुमारे 350 वर्षांची परंपरा आहे.
प्रिती निकम, प्रतिनिधी
सांगली : पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठी यात्रा म्हणून सांगलीच्या इस्लामपूर शहरातील 'संभूआप्पा-बुवाफन उरुस' ओळखला जातो. हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतीक असलेल्या या उत्सवाला सुमारे 350 वर्षांची परंपरा आहे. कार्तिक पौर्णिमेपासून 20-25 दिवस चालणारा हा उरूस राष्ट्रीय एकात्मतेचे आणि गुरुशिष्य परंपरेचे प्रतीक समजला जातो. ज्यांच्या भक्तीसाठी हा उरूस साजरा होतो ते कोण होते संभूआप्पा? काय आहे उरूसाची परंपरा? याबद्दलच मठाधिपती मिलिंद मठकरी यांनी माहिती दिली आहे.
advertisement
मूळचे लिंगायत कोष्टी असलल्या संभूआप्पांचे गुरू मालगावचे बुवाफन होते. संभूआप्पा हे लिंगायत कोष्टी समाजातील सत्पुरुप तर बुवाफन हे संभूआप्पांचे गुरू मुस्लिम समाजातील. दोघेही मूळ मिरजेच्या मालगावचे होते. खरं तर संत-महात्म्यांना जात-धम नसतो. असतो तो एकच 'मानवता धर्म' याच धर्माचे पालन उरुण इस्लामपूरचे नागरिक गेली 350 वर्षे गुण्यागोविंदाने करीत आहेत.
advertisement
कार्तिक पौर्णिमा हा श्री संभूआप्पांचा जन्मदिवस मानला जातो. पौष मास वद्य नवमी शके 1663 रोजी संभूआप्पांनी समाधी घेतल्यानंतर त्यांच्या पश्चात त्यांच्या पत्नी इरुबाईं आणि पुत्र श्री बाबुआप्पा-पहिले मठाधिपती यांनी मठाचा कार्यभार पाहण्यास सुरुवात केली. त्यांच्या काळापासूनच उरुस भरविण्याची प्रथा सुरू झाली असल्याचे सध्याचे मठाधिपती मिलिंद मठकरी यांनी सांगितले.
advertisement
कार्तिक शुद्ध दशमीस पाच चांदण्या असणारा नक्षीदार कापडी मंडप उभारून व गूळ किंवा साखर वाटून उरुसास सुरुवात करण्याची प्रथा आजही जोपासली जाते. यावेळी सर्व जाती-धमाचे लोक एकत्र यतात. सर्वजण सन्मानपूर्वक आपली परंपरागत सेवा बजावतात आणि एकदिलाने मंडप चढवून आनंदोत्सव साजरा करतात.
हिंदू-मुस्लिम ऐक्यासह सर्वधर्मसमभाव जपणारी ही यात्रा इस्लामपूर शहराचे सांस्कृतिक वैभव मानली जाते. हिंदू-मुस्लिम बांधवांसह बारा बलुतेदार मिळून उरुसाचे सर्व धार्मिक विधी पार पाडतात. इस्लामपुरातील विस्तीर्ण जागेमध्ये खेळणी आणि खाद्यपदार्थांचे 500 हून अधिक स्टॉल्स लागतात. पश्चिम महाराष्ट्रासह कर्नाटकातील भाविक मोठ्या उत्साहाने उरूसाचा उत्सव साजरा करतात. या यात्रेच्या माध्यमातून इस्लामपूर पालिकेस कर स्वरूपात जवळपास सहा लाखांचे उत्पन्नही मिळते. विविध धार्मिक, सांस्कृतिक ,मनोरंजनाच्या कार्यक्रमांसह बैल बाजार आणि रांगोळ्यांच्या स्पर्धा तसेच प्रदर्शनेदेखील थाटली जातात.
Location :
Sangli,Maharashtra
First Published :
November 30, 2024 4:44 PM IST
मराठी बातम्या/अध्यात्म/
महाराष्ट्र देशा! इथं मुस्लिमांसोबत एकत्र येऊन हिंदू साजरा करता उरूस, 350 वर्षांची परंपरा!