Saphala Ekadashi 2025: यंदा सफला एकादशीचा दिवस अत्यंत शुभ; शोभन योगात पूजा-मुहूर्त, उपवास वेळा
- Published by:Ramesh Patil
Last Updated:
Saphala Ekadashi 2025 Date: धार्मिक श्रद्धेनुसार, सफला एकादशीचं व्रत केल्यानं सर्व प्रयत्नांना चांगले यश मिळते. विष्णूच्या कृपेने पापांचा नाश होते आणि मोक्ष मिळतो. सफला एकादशी कधी आहे, पंचांगानुसार तिचे महत्त्व, धार्मिक विधी जाणून घेऊया.
मुंबई : यंदाचा मार्गशीर्ष महिना खास आहे कारण, यात दोन एकादशी आल्या आहेत. मोक्षदा एकादशी नंतर आता सफला एकादशीदेखील मार्गशीर्ष महिन्यातच येत आहे. कृष्ण पक्षातील एकादशी तिथीला सफला एकादशीचं व्रत साजरं होणार आहे. सफला एकादशीला मनोभावे श्री हरी विष्णूची पूजा करून व्रत कथा ऐकावी. या वर्षी सफला एकादशीला सुंदर योग निर्माण होत आहे. धार्मिक श्रद्धेनुसार, सफला एकादशीचं व्रत केल्यानं सर्व प्रयत्नांना चांगले यश मिळते. विष्णूच्या कृपेने पापांचा नाश होते आणि मोक्ष मिळतो. सफला एकादशी कधी आहे, पंचांगानुसार तिचे महत्त्व, धार्मिक विधी जाणून घेऊया.
द्रिक पंचांगानुसार, मार्गशीर्ष एकादशीच्या कृष्ण पक्षातील सफला एकादशीसाठी आवश्यक तिथी 14 डिसेंबर रोजी संध्याकाळी 06:49 वाजता सुरू होतेय. ही तिथी 15 डिसेंबर रोजी रात्री 09:19 वाजता संपेल. उदयतिथीच्या आधारे, सफला एकादशीचे व्रत 15 डिसेंबर, सोमवारी आहे.
सफला एकादशी मुहूर्त - सफला एकादशीला त्या दिवसाचा शुभ मुहूर्त म्हणजे अभिजित मुहूर्त, सकाळी 11:56 ते दुपारी 12:37 पर्यंत असेल. सफला एकादशी व्रत करणारे अमृत-सर्वोत्तम मुहूर्तात सकाळी 07:06 ते 08:24 दरम्यान भगवान विष्णूची पूजा करू शकतात.
advertisement
पूजेचा दुसरा शुभ मुहूर्त सकाळी 09:41 ते 10:59 पर्यंत असेल. या दोन शुभ मुहूर्तांमध्ये पूजा करावी. त्या दिवसाचा राहु काळ सकाळी 08:24 ते 09:41 पर्यंत असेल. या काळात कोणतेही शुभ कार्य करू नका.
शोभन योगातील सफला एकादशी -
advertisement
15 डिसेंबर रोजी सफला एकादशीला शोभन योग तयार होत आहे. शोभन योग सकाळपासून दुपारी 12:30 वाजेपर्यंत असेल. त्यानंतर अतिगंड योग तयार होईल. एकादशीला चित्रा नक्षत्र सकाळपासून 11:08 वाजेपर्यंत असेल त्यानंतर स्वाती नक्षत्र लागत आहे.
उपवास कधी सोडायचा - सफला एकादशीचा उपवास करणाऱ्यांनी मंगळवार, 16 डिसेंबर रोजी उपवास सोडला पाहिजे. उपवास सोडण्याची शुभ वेळ सकाळी 07:07 ते 09:11 वाजेपर्यंत आहे. उपवास सोडण्यासाठीची द्वादशी तिथी रात्री 11:57 वाजता संपेल.
advertisement
(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
December 07, 2025 9:16 AM IST
मराठी बातम्या/अध्यात्म/
Saphala Ekadashi 2025: यंदा सफला एकादशीचा दिवस अत्यंत शुभ; शोभन योगात पूजा-मुहूर्त, उपवास वेळा


