Rashid Khan 2nd Marriage : राशिदने ऑगस्टमध्ये गुपचूप उरकलं होतं दुसरं लग्न, मग तीन महिन्यांनी का दिली कबुली?

Last Updated:

अफगाणिस्तानचा फिरकी गोलंदाज रशीद खानने दुसरं लग्न उरकल्याची घटना समोर आली आहे. राशीद खानने स्वत:च सोशल मीडियावर पोस्ट शेअर करून ही माहिती दिली आहे.

Rashid Khan 2nd Marriage
Rashid Khan 2nd Marriage
Rashid Khan 2nd Marriage : अफगाणिस्तानचा फिरकी गोलंदाज रशीद खानने दुसरं लग्न उरकल्याची घटना समोर आली आहे. राशीद खानने स्वत:च सोशल मीडियावर पोस्ट शेअर करून ही माहिती दिली आहे. विशेष म्हणजे राशीदने त्याचं हे दुसरं लग्न 2 ऑगस्ट 2025 रोजी केलं होतं. पण आता लग्नाच्या तीन महिन्यानंतर त्याने या गोष्टीची कबूली का दिली आहे? हे जाणून घेऊयात.
खरं तर राशीद खानने दुसरं लग्न केल्याची कुणालाच कानोकान खबर नव्हती. पण काही दिवसांपूर्वी राशीद खान एका चॅरीटी कार्यक्रमात एका तरूणी सोबत दिसला होता. त्या कार्यक्रमाचे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले होते. या व्हायरल फोटोनंतर राशीद खानसोबत दिसणारी ती सुंदरी कोण? असा चाहत्यांनी प्रश्न विचारायला सूरूवात केली होती.त्यामुळे अखेर राशीद खानला आपल्या दुसऱ्या लग्नाची कबुली द्यावी लागली आहे.
advertisement



 










View this post on Instagram























 

A post shared by Rashid Khan (@rashid.khan19)



advertisement
राशीद खानने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करून आपल्या दुसऱ्या लग्नाची माहिती दिली आहे.यावेळी तो आपल्या पोस्टमध्ये लिहतो की, "2 ऑगस्ट 2025 रोजी मी माझ्या आयुष्यातील एक नवीन अध्याय सुरू केला.मी एका महिलेशी लग्न केले जी प्रेम, शांती आणि भागीदारीची प्रतीक आहे ज्याची मी नेहमीच अपेक्षा करत असे.",
"मी अलीकडेच माझ्या पत्नीला एका धर्मादाय कार्यक्रमात घेऊन गेलो. इतक्या छोट्या गोष्टीबद्दल अंदाज लावणे दुर्दैवी आहे. सत्य हे आहे की, ती माझी पत्नी आहे आणि आम्ही एकत्र आहोत आणि आम्हाला काहीही लपवण्याची गरज नाही,असे राशीद खानने शेवटी सांगितले.
advertisement
नेदरलँड्समधील एका धर्मादाय कार्यक्रमात फोटो आणि व्हिडिओ समोर आले होते, ज्यामध्ये तो पारंपारिक अफगाण पोशाख परिधान केलेल्या महिलेच्या शेजारी बसलेला दिसत होता. यामुळे त्याच्या दुसऱ्या लग्नाचे दावे करण्यात आले होते.
ऑक्टोबर 2024 मध्ये पहिलं लग्न
गेल्यावर्षी ऑक्टोबरमध्ये राशीद खानने त्याच्या तीन भावांसोबत एकाच दिवशी निकाह केला होता. लग्न पख्तून परंपरेनुसार पार पडले होते.या निकाहमध्ये अफगाणिस्तान संघातील अनेक खेळाडू सहभागी झाले होते.काबूलमधील इम्पीरियल कॉन्टिनेंटल हॉटेलमध्ये झालेल्या लग्न समारंभात मोहम्मद नबीसह अनेक अफगाण क्रिकेटपटू उपस्थित होते. यामध्ये अझमतुल्लाह उमरझाई, नजीबुल्लाह झदरान, रहमत शाह आणि मुजीब उर रहमान यांचा समावेश होता.
view comments
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
Rashid Khan 2nd Marriage : राशिदने ऑगस्टमध्ये गुपचूप उरकलं होतं दुसरं लग्न, मग तीन महिन्यांनी का दिली कबुली?
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement