Ashes : 'पिंक बॉल' टेस्टमध्ये इंग्लंडची धूळधाण, WTC पॉईंट्स टेबलमध्ये मोठा उलटफेर, भारत कितव्या क्रमांकावर?
- Published by:Shreyas Deshpande
Last Updated:
ऑस्ट्रेलियाने ऍशेस 2025-26 मध्ये लागोपाठ दुसरा विजय मिळवत सीरिजमध्ये 2-0 ने आघाडी घेतली आहे. ब्रिस्बेनमध्ये झालेल्या पिंक बॉल टेस्टमध्ये इंग्लंडचा 8 विकेटने लाजिरवाणा पराभव झाला.
ब्रिस्बेन : ऑस्ट्रेलियाने ऍशेस 2025-26 मध्ये लागोपाठ दुसरा विजय मिळवत सीरिजमध्ये 2-0 ने आघाडी घेतली आहे. ब्रिस्बेनमध्ये झालेल्या पिंक बॉल टेस्टमध्ये इंग्लंडचा 8 विकेटने लाजिरवाणा पराभव झाला. इंग्लंडच्या या पराभवामुळे वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या यंदाच्या सत्रातल्या पॉईंट्स टेबलमध्ये उलटफेर झाला आहे. इंग्लंडच्या पराभवामुळे न्यूझीलंडला गूड न्यूज मिळाली आहे. किवी टीमने एक स्थान वर उडी घेतली आहे.
कोणाचा फायदा, कुणाचं नुकसान?
दुसऱ्या टेस्टमधल्या या पराभवामुळे इंग्लंड वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या पॉईंट्स टेबलमध्ये सहाव्या क्रमांकावरून सातव्या क्रमांकावर फेकली गेली आहे. इंग्लंडचा या सत्रात 7 पैकी 4 सामन्यांमध्ये पराभव झाला आहे, तर 2 सामन्यांमध्ये त्यांचा विजय झाला आणि एक मॅच ड्रॉ झाली. इंग्लंडची विजयी टक्केवारी 30.95 एवढी आहे. इंग्लंडच्या विजयाचा न्यूझीलंडला फायदा झाला असून ते सहाव्या क्रमांकावर आले आहेत. न्यूझीलंडने या सत्रात एकच मॅच खेळली आहे, वेस्ट इंडिजविरुद्धची ही मॅच ड्रॉ झाली. किवी टीमची विजयी टक्केवारी 33.33 टक्के आहे.
advertisement
भारत कितव्या क्रमांकावर?
WTC पॉईंट्स टेबलमध्ये भारत पाचव्या क्रमांकावर कायम आहे. टीम इंडियाकडे सध्या 48.11 पॉईंट्स आहेत. भारताने या सत्रात 9 मॅच खेळल्या असून 4 सामन्यांमध्ये त्यांचा विजय झाला तर 4 मॅचमध्ये पराभव आणि एक सामना ड्रॉ झाला आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध घरच्याच मैदानात 2-0 ने पराभव झाल्यामुळे टीम इंडियाला पॉईंट्स टेबलमध्ये धक्का बसला आहे.
advertisement
ऑस्ट्रेलिया नंबर वनवर कायम
ऑस्ट्रेलिया WTC पॉईंट्स टेबलमध्ये पहिल्या क्रमांकावर कायम आहे. ऑस्ट्रेलियाने या सत्रात 5 मॅच खेळल्या असून सगळ्या मॅचमध्ये त्यांचा विजय झाला आहे. ऑस्ट्रेलियाची विजयी टक्केवारी 60 आहे. तर दुसऱ्या क्रमांकावर दक्षिण आफ्रिका आहे, ज्यांची विजयी टक्केवारी 70 आहे. दक्षिण आफ्रिकेने या सत्रात 4 मॅच खेळल्या आहेत, ज्यातल्या 3 मॅचमध्ये त्यांचा विजय झाला आणि एक सामना ड्रॉ झाला. श्रीलंका आणि पाकिस्तान तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकावर आहेत. श्रीलंकेची विजयी टक्केवारी 66.67 आणि पाकिस्तानची 50 टक्के आहे. श्रीलंकेने या सत्रात एक मॅच जिंकली आणि त्यांचा एक सामना ड्रॉ झाला, तर पाकिस्तानचा एका सामन्यात विजय आणि एकात पराभव झाला आहे.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
December 07, 2025 5:43 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
Ashes : 'पिंक बॉल' टेस्टमध्ये इंग्लंडची धूळधाण, WTC पॉईंट्स टेबलमध्ये मोठा उलटफेर, भारत कितव्या क्रमांकावर?


