VIDEO : डोळे दाखवले, अंगावर धावला नंतर... LIVE सामन्यात दोन दिग्गज भिडले, मॅचमध्ये भयंकर राडा
- Published by:Prashant Gomane
Last Updated:
लाईव्ह सामन्यात दोन दिग्गज खेळाडू आपआपसात भिडल्याची घटना घडली आहे. दोघांमध्ये मैदानात भयंकर राडा झाला होता. या राड्याचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर समोर आला आहे.
Australia vs England Ashes Test : क्रिकेटमध्ये खेळाडूंची एकमेकांमध्ये बाचाबाची होणे हे काय नवीन नाही. अशा घटना क्रिकेटच्या मैदानात नेहमीच घडत असतात. अशीच एक घटना आता समोर आली आहे. या घटनेत लाईव्ह सामन्यात दोन दिग्गज खेळाडू आपआपसात भिडल्याची घटना घडली आहे. दोघांमध्ये मैदानात भयंकर राडा झाला होता. या राड्याचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर समोर आला आहे.त्यामुळे मैदानात नेमकं काय घडलं आहे? हे जाणून घेऊयात.
advertisement
खरं तर अॅशेस मालिकेच्या दुसऱ्या टेस्ट सामन्यात ऑस्ट्रेलियाला 27 धावांची आवश्यकता असताना मैदानात हा राडा झाला होता.त्यावेळेस ऑस्ट्रेलियाकडून स्टिव्ह स्मिथ आणि जेक वेदराल्ड मैदानात होते.ऑस्ट्रेलियाला अवघ्या 27 धावा हव्या असल्याने इंग्लंडचा जोफ्रा आर्चर मैदानात चिडून आक्रमकपणे गोलंदाजी करत होता.
advertisement
PEAK ASHES MOMENTS. 🔥 pic.twitter.com/E90svC11Zg
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) December 7, 2025
जोफ्रा आर्चरकडून आक्रमकपणे गोलंदाजी करायला सूरूवात झाली होती. ते पाहुन स्टीव्ह स्मिथ आर्चरकडे बघून म्हणाला, "जेव्हा काहीही चालत नाही तेव्हा जलद गोलंदाजी करा, चॅम्पियन'', अशा शब्दात स्टीव्ह स्मिथने आर्चरला डिवचलं होतं. त्यामुळे स्टिव्ह स्मिथ आणि आर्चरमध्ये शाब्दिक वाद झाला होता.
advertisement
9 व्या ओव्हरच्या पहिल्या बॉलवर स्मिथने आर्चरला चौकार मारल्यानंतर वाद सुरू झाला. आर्चरने शॉर्ट बॉलने स्मिथला त्रास देण्याचा प्रयत्न केला, परंतु स्टिव्ह स्मिथने त्याच्या तीन बॉलवर एक षटकार आणि दोन चौकार अशा साधारण 14 धावा काढल्या होत्या. विशेष म्हणजे या धावा काढल्याने ऑस्ट्रेलिया विजयाच्या आणखी जवळ आली होती. त्यामुळे मैदानात वातावरण तापलं होतं.
advertisement
दरम्यान ब्रिस्बेन येथे झालेल्या गुलाबी चेंडूच्या कसोटीत ऑस्ट्रेलियाने विजय मिळवला आहे. यजमान संघाने इंग्लंडचा आठ विकेट्सनी पराभव करून पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत 2-0 अशी आघाडी घेतली आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
December 07, 2025 5:43 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
VIDEO : डोळे दाखवले, अंगावर धावला नंतर... LIVE सामन्यात दोन दिग्गज भिडले, मॅचमध्ये भयंकर राडा


