IND vs AUS 3rd T20 : अखेर अनलकी सूर्याने टॉस जिंकला! टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये तीन मोठे बदल, संजूला डच्चू!
- Published by:Saurabh Talekar
Last Updated:
Australia vs India 3rd T20I Playing XI : खूप दिवसानंतर टॉस जिंकल्याने सूर्यकुमारच्या चेहऱ्यावर हसू दिसत होतं. टॉस जिंकल्यावर सूर्याने आनंद व्यक्त केला. टीम इंडियात तीन मोठे बदल केल्याचं सूर्याने सांगितलं.
Australia vs India, 3rd T20I : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसऱ्या टी-ट्वेंटी सामन्यात टीम इंडियाने टॉस जिंकला असून प्रथम बॉलिंग करण्याचा निर्णय घेतला आहे. खूप दिवसानंतर टॉस जिंकल्याने सूर्यकुमारच्या चेहऱ्यावर हसू दिसत होतं. टॉस जिंकल्यावर सूर्याने आनंद व्यक्त केला आणि आपले इरादे स्पष्ट केले. त्यावेळी टीम इंडियात तीन मोठे बदल केल्याचं सूर्याने सांगितलं.
टीम इंडियामध्ये तीन मोठे बदल
आजच्या मॅचसाठी टीम इंडियामध्ये तीन मोठे बदल करण्यात आले आहेत. जितेश शर्मा, अर्शदीप सिंग आणि वॉशिंग्टन सुंदर यांचा समावेश प्लेइंग इलेव्हनमध्ये करण्यात आला आहे. या बदलांमुळे संजू सॅमसन, हर्षित राणा आणि कुलदीप यादव यांना वगळण्यात आले आहे.
हेझलवूड बाहेर, शॉन अॅबॉटला संधी
advertisement
टीम इंडियाला तिसऱ्या सामन्यात जोश हेझलवूडचा सामना करावा लागणार नाही. अॅशेसच्या तयारीसाठी हेझलवूड फक्त दोन टी-ट्वेंटी सामन्यांसाठी उपलब्ध होता. दुसऱ्या सामन्यात हेझलवूडमुळे टीम इंडियाला पराभवाचं तोंड पहावं लागलं होतं. त्याच्या जागी आता शॉन अॅबॉट याला संधी देण्यात आली आहे.
A look at #TeamIndia’s Playing XI ahead of the rd T20I
Updates https://t.co/X5xeZ0LEfC#AUSvIND pic.twitter.com/acjQQyLcAA
— BCCI (@BCCI) November 2, 2025
advertisement
ऑस्ट्रेलिया (प्लेइंग इलेव्हन): मिचेल मार्श (कर्णधार), ट्रॅव्हिस हेड, जोश इंग्लिस (विकेटकीपर), टिम डेव्हिड, मिचेल ओवेन, मार्कस स्टोइनिस, मॅथ्यू शॉर्ट, शॉन अॅबॉट, झेवियर बार्टलेट, नॅथन एलिस, मॅथ्यू कुहनेमन.
भारत (प्लेइंग इलेव्हन): शुभमन गिल, अभिषेक शर्मा, सूर्यकुमार यादव (कर्णधार), तिलक वर्मा, जितेश शर्मा (विकेटकीपर), शिवम दुबे, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, अर्शदीप सिंग, वरुण चक्रवर्ती, जसप्रीत बुमराह.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
November 02, 2025 1:30 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
IND vs AUS 3rd T20 : अखेर अनलकी सूर्याने टॉस जिंकला! टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये तीन मोठे बदल, संजूला डच्चू!


