WPL 2026 चं वेळापत्रक जाहीर, मुंबई इंडियन्ससोबत कुणाची ओपनिंग मॅच? नवी मुंबईत नाही तर फायनल सामना कुठं?
- Published by:Saurabh Talekar
Last Updated:
Womens Premier League 2026 schedule : महिला प्रीमियर लीगचा पहिला टप्पा ९ जानेवारी ते १७ जानेवारी दरम्यान नवी मुंबईत खेळवला जाईल. दुसरा टप्पा १९ जानेवारी ते ५ फेब्रुवारी दरम्यान वडोदरा येथे होईल.
WPL 2026 Full schedule : वुमेन्स प्रीमियर लीग 2026 ची सुरुवात 9 जानेवारी रोजी नवी मुंबईतील डॉ. डीवाय पाटील स्टेडियमवर मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यातील पहिल्या सामन्याने होईल. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) शनिवारी, 29 नोव्हेंबर रोजी याची घोषणा केली. यापूर्वी, 27 नोव्हेंबर रोजी दिल्ली येथे झालेल्या महिला प्रीमियर लीग मेगा लिलावादरम्यान, लीगचे अध्यक्ष जयेश जॉर्ज यांनी स्पर्धेच्या तारखा आणि ठिकाण जाहीर केले होते.
फक्त दोन डबलहेडरचा समावेश
महिला प्रीमियर लीगचा पहिला टप्पा ९ जानेवारी ते १७ जानेवारी दरम्यान नवी मुंबईत खेळवला जाईल. दुसरा टप्पा १९ जानेवारी ते ५ फेब्रुवारी दरम्यान वडोदरा येथे होईल. अंतिम सामनाही वडोदरा येथेच खेळवला जाईल. लीग टप्प्यात एकूण २० सामने खेळवले जातील. एलिमिनेटर ३ फेब्रुवारी रोजी खेळवला जाईल आणि त्यानंतर दोन दिवसांनी ५ फेब्रुवारी रोजी अंतिम सामना होईल. वेळापत्रकात फक्त दोन डबलहेडरचा समावेश आहे.
advertisement
पाहा संपूर्ण वेळापत्रक
९ जनवरी- मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगलुरु, नवी मुंबई
१० जानेवारी - यूपी वॉरियर्स विरुद्ध गुजरात जायंट्स, नवी मुंबई
१० जानेवारी - मुंबई इंडियन्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स, नवी मुंबई
११ जानेवारी - दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध गुजरात जायंट्स, नवी मुंबई
१२ जानेवारी - रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध यूपी वॉरियर्स, नवी मुंबई
advertisement
१३ जानेवारी - मुंबई इंडियन्स विरुद्ध गुजरात जायंट्स, नवी मुंबई
१४ जानेवारी - यूपी वॉरियर्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स, नवी मुंबई
१५ जानेवारी - मुंबई इंडियन्स विरुद्ध यूपी वॉरियर्स, नवी मुंबई
१६ जानेवारी - रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध गुजरात जायंट्स, नवी मुंबई
१७ जानेवारी - यूपी वॉरियर्स विरुद्ध मुंबई इंडियन्स, नवी मुंबई
advertisement
१७ जानेवारी - दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, नवी मुंबई
१९ जानेवारी - गुजरात जायंट्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, वडोदरा
२० जानेवारी - दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध मुंबई इंडियन्स, वडोदरा
२२ जानेवारी - गुजरात जायंट्स विरुद्ध यूपी वॉरियर्स, वडोदरा
२४ जानेवारी - रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स, वडोदरा
२६ जानेवारी - रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध मुंबई इंडियन्स, वडोदरा
advertisement
२७ जानेवारी - गुजरात जायंट्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स, वडोदरा
२९ जानेवारी - यूपी वॉरियर्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, वडोदरा
३० जानेवारी - गुजरात जायंट्स विरुद्ध मुंबई इंडियन्स, वडोदरा
१ फेब्रुवारी - दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध यूपी वॉरियर्स, वडोदरा
३ फेब्रुवारी - एलिमिनेटर, वडोदरा.
५ फेब्रुवारी - फायनल सामना, वडोदरा.
दरम्यान, 2023 मध्ये मुंबई इंडियन्सने विजेतेपद जिंकले होते, तर 2024 मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने विजेतेपद पटकावले होते. 2026 मध्ये कोणता संघ ट्रॉफी जिंकतो हे पाहणे मनोरंजक असेल. पॉइंट टेबलमध्ये अव्वल स्थानावर असलेला संघ थेट अंतिम फेरीत पोहोचेल, तर दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानावर असलेल्या संघांना एलिमिनेटरमध्ये खेळावे लागेल.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
November 29, 2025 12:08 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
WPL 2026 चं वेळापत्रक जाहीर, मुंबई इंडियन्ससोबत कुणाची ओपनिंग मॅच? नवी मुंबईत नाही तर फायनल सामना कुठं?


