IND vs SA : शुभमन धडधडीत खोटं बोलला! रोहित अन् विराटविरुद्ध BCCI चं फर्मान, एकाच अटीवर संघात मिळणार संधी!
- Published by:Saurabh Talekar
Last Updated:
BCCI On Playing Domestic Cricket : दोन्ही खेळाडूंचा फॉर्म चांगला रहावा, यासाठी बीसीसीआयने दोन्ही खेळाडूंना डोमेस्टिक क्रिकेट खेळण्याचा सल्ला दिला आहे.
BCCI Appeal Playing Domestic Cricket : रोहित शर्मा आणि विराट कोहली या टीम इंडियाच्या दिग्गजांचं वनडे क्रिकेटमधलं भविष्य काय? दोन्ही खेळाडू 2027 चा वनडे वर्ल्ड कप खेळणार का? मागचे काही दिवस भारतीय क्रिकेटच्या चाहत्यांना हेच प्रश्न पडत आहेत. या प्रश्नांचं उत्तर खुद्द शुभमन गिलने दिलं होतं. दोन्ही खेळाडू वर्ल्ड कप खेळतील, असं शुभमन गिल म्हणाला होता. ऑस्ट्रेलिया वनडे मालिकेनंतर शुभमन गिलने एका प्रश्नाचं उत्तर दिलं होतं. त्यानंतर आता बीसीसीआयने मोठं पाऊल उचललं आहे.
डोमेस्टिक क्रिकेट खेळण्याचा सल्ला
रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी टेस्ट आणि टी-20 क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे, त्यामुळे दोन्ही खेळाडू आता फक्त वनडे क्रिकेटच खेळणार आहेत. अशातच दोन्ही खेळाडूंचा फॉर्म चांगला रहावा, यासाठी बीसीसीआयने दोन्ही खेळाडूंना डोमेस्टिक क्रिकेट खेळण्याचा सल्ला दिला आहे.
भारताकडून खेळायचे असेल तर...
advertisement
बोर्ड आणि संघ व्यवस्थापनाने दोघांनाही कळवले आहे की जर त्यांना भारताकडून खेळायचे असेल तर त्यांना डोमेस्टिक क्रिकेट खेळावे लागेल. दोघांनीही दोन्ही फॉरमॅटमधून निवृत्ती घेतली असल्याने, सामन्यासाठी तंदुरुस्त राहण्यासाठी त्यांना डोमेस्टिक क्रिकेट खेळावे लागेल," असं बीसीसीआयच्या एका सूत्राने द इंडियन एक्सप्रेसला सांगितलं आहे.
शुभमन गिल खोटं बोलला?
दरम्यान, ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर एका पत्रकाराने शुभमन गिलला रोहित अन् विराटच्या डोमेस्टिक क्रिकेट खेळण्यावर प्रश्न विचारला होता. त्यावेळी रोहित आणि विराट यांना आत्ताच काही सांगण्यात येणार नाही. पण साऊथ अफ्रिका दौऱ्यानतंर सांगण्यात येऊ शकतं, असं शुभमन गिल म्हणाला होता. मात्र, आता साऊथ अफ्रिका दौऱ्यापूर्वीच बीसीसीआयने रोहित अन् विराटला वॉर्निंग दिली आहे.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
November 12, 2025 11:56 AM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
IND vs SA : शुभमन धडधडीत खोटं बोलला! रोहित अन् विराटविरुद्ध BCCI चं फर्मान, एकाच अटीवर संघात मिळणार संधी!


