Vaibhav Suryavanshi : वैभवच्या एकट्याच्या 42 बॉल 144 धावा, युएई 120 मध्ये 150 ही करू शकली नाही, लाजिरवाणा पराभव
- Published by:Prashant Gomane
Last Updated:
आशिया कप रायझिंग स्टार 2025-26 स्पर्धेतील युएई विरूद्ध पहिल्याच सामन्यात वैभव सुर्यवंशीने खतरनाक खेळी केली आहे. या सामन्यात वैभव सुर्यवंशी एकटा पूरून उरला होता. कारण वैभवने एकट्याने या सामन्यात 42 बॉलमध्ये 144 धावा केल्या होत्या.
Vaibhav Suryavanshi : आशिया कप रायझिंग स्टार 2025-26 स्पर्धेतील युएई विरूद्ध पहिल्याच सामन्यात वैभव सुर्यवंशीने खतरनाक खेळी केली आहे. या सामन्यात वैभव सुर्यवंशी एकटा पूरून उरला होता. कारण वैभवने एकट्याने या सामन्यात 42 बॉलमध्ये 144 धावा केल्या होत्या. त्याच तुलनेत युएई 120 बॉल म्हणजेच 20 ओव्हरमध्ये 150 ही धावा गाठू शकली नाही. त्यामुळे त्यांचा 148 इतक्या मोठ्या फरकाने पराभव झाला आहे.म्हणूनच वैभव युएईला एकटाचा काफी ठरला.
भारताने प्रथम फलंदाजी करताना 4 विकेट गमावून 297 धावा केल्या होत्या. त्यामुळे युएईसमोर 298 धावांचे आव्हान होते. या आव्हानाचा पाठलाग करताना युएईची सूरूवात खराब झाली होती. युएईच्या सलामीवीर स्वस्तात बाद झाले होते. युएईकडून सोहेब खान या एकट्या खेळाडूने सर्वाधिक 63 धावा केल्या होत्या. त्याच्या व्यतिरीक्त कोणत्याही खेळाडूला मोठ्या धावा करता आल्या नव्हत्या. त्यामुळे युएई 20 ओव्हरमध्ये फक्त 7 विकेट गमावून 149 धावांपर्यंत मजल मारू शकली होती.त्यामुळे भारताने 148 इतक्या मोठ्या फरकाने युएईचा पराभव केला.
advertisement
विशेष म्हणजे भारताच्या वैभव सुर्यवंशीने एकट्याने जितक्या 42 बॉलमध्ये 144 धावा केल्या होत्या. त्याहून फक्त 6 धावा जास्त म्हणजे 150 धावा युएई 120 बॉल म्हणजेच 20 ओव्हरमध्ये करू शकली नव्हती.त्यामुळे वैभव सुर्यवंशी युएईला एकटा पुरून उरला होता.
भारताचा पहिला डाव
या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना वैभव सूर्यवंशीने वादळी खेळी केली आहे.वैभवने पहिल्यांदा 17 बॉलमध्ये अर्धशतक ठोकलं.त्यानंतर त्याने पुढे जाऊन 32 बॉलमध्ये आपलं शतक पुर्ण केलं होतं. शतकानंतरही तो थांबला नाही त्याच ताकदीने खेळत राहिला. अशाप्रकारे तो 42 बॉलमध्ये तो 144 धावा करून बाद झाला. या दरम्यान त्याने 15 षटकार आणि 11 चौकार लगावले होते. अशाप्रकारे त्याने एकट्याने 342 च्या स्ट्राईक रेटने धावा केल्या होत्या.
advertisement
वैभव पाठोपाठा कर्णधार जितेश शर्माने देखील जबरदस्त फलंदाजी केली आहे. जितेश शर्माने 32 बॉलमध्ये 83 धावा ठोकल्या आहेत. या दरम्यान त्याने 6 षटकार आणि 8 चौकार लगावले होते. या दोन्ही खेळाडूंच्या वादळी खेळीच्या बळावर भारताने 20 ओव्हरमध्ये 4 विकेट गमावून 297 धावा ठोकल्या आहेत.
युएईकडून मोहम्मद फराजुद्दीन आणि आर्यन अफजल खान,मुहम्मद अरफाने प्रत्येकी एक विकेट काढली आहे.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
November 14, 2025 9:17 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
Vaibhav Suryavanshi : वैभवच्या एकट्याच्या 42 बॉल 144 धावा, युएई 120 मध्ये 150 ही करू शकली नाही, लाजिरवाणा पराभव


