IND vs AUS 3rd T20 : पहिल्या दोन मॅचमध्ये केली चूक, तिसऱ्यात सुधारली; चौथ्याच बॉलवर अर्शदीपची कमाल, पाहा Video
- Published by:Saurabh Talekar
Last Updated:
Arshdeep Singh picked up Travis Head : अर्शदीप सिंगला पहिल्या दोन मॅचमध्ये संधी दिली गेली नव्हती. त्याऐवजी गंभीरच्या लाडक्याला संधी दिली गेली. अशातच आता गंभीरने आपली चूक सुधारली.
India vs Australia 3rd T20 : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पाच सामन्यांच्या टी20 मालिकेतील तिसरा सामना आज खेळला जात आहे. दोन्ही संघांनी होबार्ट बेलेरिव्ह ओव्हल येथे मैदानावर उतरले आहे. भारताचा कर्णधार सूर्यकुमार यादवने टॉस जिंकून प्रथम बॉलिंग करण्याचा निर्णय घेतला होता. सूर्याचा हाच निर्णय अर्शदीप सिंगने खरा करून दाखवला आहे. पहिली ओव्हर घेऊन आलेल्या अर्शदीप सिंगने भारताला पहिला आणि सर्वात मोठा ब्रेकथ्रू मिळवून दिला. चौथ्याच बॉलवर अर्शदीपने गंभीरला चोख प्रत्युत्तर दिलंय.
ट्रॅव्हिस हेड आऊट
अर्शदीप सिंगच्या गोलंदाजीवर ऑस्ट्रेलियाचा सलामीचा बॅट्समन ट्रॅव्हिस हेड आऊट झाला. अर्शदीपने टाकलेला गुड लेन्थचा बॉल ऑफ स्टंपच्या बाहेर पिच झाला. हेडने बॉलच्या बॉन्ड्रीवर येऊन कव्हर्सवरून शॉट मारण्याचा प्रयत्न केला, पण त्याला लीडिंग एज लागली आणि बॉल थेट हवेत गेला. टीम इंडियाचा कॅप्टन सूर्यकुमार यादवने तो अगदी सोपा कॅच पकडण्यात कोणतीही चूक केली नाही.
advertisement
दोन मॅचमध्ये केली चूक, तिसऱ्यात सुधारली
अर्शदीपचे पहिल्याच ओव्हरमध्ये विकेट घेऊन दमदार कमबॅक होते, ज्याने संघाला अत्यंत आवश्यक असलेला विकेट मिळवून दिली. अर्शदीप सिंगला पहिल्या दोन मॅचमध्ये संधी दिली गेली नव्हती. त्याऐवजी गंभीरच्या लाडक्याला संधी दिली गेली. अशातच आता गंभीरने आपली चूक सुधारली अन् अर्शदीप सिंगला तिसऱ्या सामन्यात संधी दिली. त्यानंतर चौथ्याच बॉलवर अर्शदीपने कमाल केली अन् हेडला माघारी पाठवलं. त्यानंतर त्याने जॉश इंग्लिशला देखील पुढच्याच ओव्हरमध्ये आऊट केलं.
advertisement
पाहा Video
Arshdeep Singh ಎಸೆತಕ್ಕೆ ತಲೆ ನೋವು ಮಾಯಾ!
ವೀಕ್ಷಿಸಿ | #AUSvIND | 3rd T20I | LIVE NOW | ನಿಮ್ಮ Star Sports ಕನ್ನಡ & JioHotstar ನಲ್ಲಿ.#TeamIndia pic.twitter.com/7OcPyxkCao
— Star Sports Kannada (@StarSportsKan) November 2, 2025
advertisement
ऑस्ट्रेलिया (प्लेइंग इलेव्हन): मिचेल मार्श (कर्णधार), ट्रॅव्हिस हेड, जोश इंग्लिस (विकेटकीपर), टिम डेव्हिड, मिचेल ओवेन, मार्कस स्टोइनिस, मॅथ्यू शॉर्ट, शॉन अॅबॉट, झेवियर बार्टलेट, नॅथन एलिस, मॅथ्यू कुहनेमन.
भारत (प्लेइंग इलेव्हन): शुभमन गिल, अभिषेक शर्मा, सूर्यकुमार यादव (कर्णधार), तिलक वर्मा, जितेश शर्मा (विकेटकीपर), शिवम दुबे, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, अर्शदीप सिंग, वरुण चक्रवर्ती, जसप्रीत बुमराह.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
November 02, 2025 2:19 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
IND vs AUS 3rd T20 : पहिल्या दोन मॅचमध्ये केली चूक, तिसऱ्यात सुधारली; चौथ्याच बॉलवर अर्शदीपची कमाल, पाहा Video


