IND vs AUS : टीम इंडियातून बाहेर काढलं, त्या दोघांनीच भारताला जिंकवलं, गंभीरची स्ट्रॅटेजी पुन्हा 'एक्सपोज'!'

Last Updated:

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या टी-20 सामन्यात टीम इंडियाचा 5 विकेटनी दणदणीत विजय झाला आहे. ऑस्ट्रेलियाने दिलेलं 187 रनचं आव्हान भारताने 18.3 ओव्हरमध्येच पूर्ण केलं.

टीम इंडियातून बाहेर काढलं, त्या दोघांनीच भारताला जिंकवलं, गंभीरची स्ट्रॅटेजी पुन्हा 'एक्सपोज'!'
टीम इंडियातून बाहेर काढलं, त्या दोघांनीच भारताला जिंकवलं, गंभीरची स्ट्रॅटेजी पुन्हा 'एक्सपोज'!'
होबार्ट : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या टी-20 सामन्यात टीम इंडियाचा 5 विकेटनी दणदणीत विजय झाला आहे. ऑस्ट्रेलियाने दिलेलं 187 रनचं आव्हान भारताने 18.3 ओव्हरमध्येच पूर्ण केलं. सहाव्या क्रमांकावर बॅटिंगला आलेल्या वॉशिंग्टन सुंदरने 23 बॉलमध्ये 213.04 च्या स्ट्राईक रेटने बॅटिंग करत नाबाद 49 रन केले. तर तिलक वर्माने 29, अभिषेक शर्माने 25, सूर्यकुमार यादवने 24 आणि जितेश शर्माने नाबाद 22 रनची खेळी केली. ऑस्ट्रेलियाकडून नॅथन एलिसला 3 विकेट मिळाल्या, तर झेवियर बार्टलेटला 1 आणि मार्कस स्टॉयनिसला 1 विकेट घेण्यात यश आलं.
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या या विजयासोबतच भारताने टी-20 सीरिजमध्ये 1-1 ने बरोबरी केली आहे. या सामन्यात टीम इंडियाचा कर्णधार सूर्यकुमार यादवने टॉस जिंकून पहिले बॉलिंगचा निर्णय घेतला, यानंतर ऑस्ट्रेलियाने 20 ओव्हरमध्ये 6 विकेट गमावून 186 रन केल्या. टीम डेव्हिडने 38 बॉलमध्ये 74 आणि मार्कस स्टॉयनिसने 39 बॉलमध्ये 64 रनची खेळी केली. भारताकडून अर्शदीप सिंगने सर्वाधिक 3 विकेट घेतल्या, याशिवाय वरुण चक्रवर्तीला 2 आणि शिवम दुबेला एक विकेट मिळाली.
advertisement

गंभीरने बाहेर ठेवलं, त्यांनीच जिंकवलं

दुसऱ्या टी-20 सामन्यात पराभव झाल्यानंतर भारताने या सामन्यात टीममध्ये 3 बदल केले. हर्षित राणा, संजू सॅमसन आणि कुलदीप यादव यांना बाहेर करण्यात आलं. त्यांच्याऐवजी अर्शदीप सिंग, वॉशिंग्टन सुंदर आणि जितेश शर्मा यांना प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी देण्यात आली. अर्शदीप सिंग आणि वॉशिंग्टन सुंदर हे दोघं टीम इंडियाच्या विजयाचे शिल्पकार ठरले. अर्शदीपने मॅचच्या चौथ्या बॉललाच विकेट घेऊन ऑस्ट्रेलियाला रोखून धरलं. अर्शदीपने 4 ओव्हरमध्ये 35 रन देऊन 3 विकेट घेतल्या. यानंतर भारताने 111/4 विकेट गमावल्या होत्या, पण मॅच फसलेली असताना वॉशिंग्टन सुंदरने ऑस्ट्रेलियाच्या बॉलिंगवर आक्रमण करून भारताचा विजय निश्चित केला. अर्शदीप सिंगला प्लेअर ऑफ द मॅच देऊन गौरवण्यात आलं.
advertisement
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातली चौथी टी-20 मॅच गुरूवार 6 नोव्हेंबरला होणार आहे. या सामन्यात विजय मिळवणारी टीम सीरिजमध्ये पराभूत होऊ शकणार नाही. दोन्ही टीममधला पहिला सामना पावसामुळे रद्द झाला, तर दुसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने आणि तिसऱ्या सामन्यात भारताने विजय मिळवला आहे. 5 टी-20 मॅचची ही सीरिज आता 1-1 ने बरोबरीमध्ये आहे.
view comments
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
IND vs AUS : टीम इंडियातून बाहेर काढलं, त्या दोघांनीच भारताला जिंकवलं, गंभीरची स्ट्रॅटेजी पुन्हा 'एक्सपोज'!'
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement