Tim David Six : क्रिकेट इतिहासातला सगळ्यात लांब सिक्स, बापूच्या बॉलिंगवर टीम डेव्हिडचा विश्वविक्रम, Video
- Published by:Shreyas Deshpande
Last Updated:
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या टी-20 सामन्यात टीम इंडियाचा 5 विकेटने विजय झाला आहे. भारताने हा सामना जिंकला असला तरी ऑस्ट्रेलियन क्रिकेटर टीम डेव्हिड याने या सामन्यात नवा विश्वविक्रम केला आहे.
होबार्ट : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या टी-20 सामन्यात टीम इंडियाचा 5 विकेटने विजय झाला आहे. भारताने हा सामना जिंकला असला तरी ऑस्ट्रेलियन क्रिकेटर टीम डेव्हिड याने या सामन्यात नवा विश्वविक्रम केला आहे. टीम डेव्हिडने क्रिकेटच्या इतिहासातला सगळ्यात मोठा सिक्स लगावला आहे. अक्षर पटेलच्या बॉलिंगवर टीम डेव्हिडने ही कामगिरी केली आहे. टीम डेव्हिडच्या या गगनभेदी सिक्सचा व्हिडिओही समोर आला आहे. टीम डेव्हिडने 38 बॉलमध्ये 194.74 च्या स्ट्राईक रेटने 74 रन केले, ज्यात 8 फोर आणि 5 सिक्सचा समावेश होता.
टीम डेव्हिडचा रेकॉर्डतोड सिक्स
ऑस्ट्रेलियाची बॅटिंग सुरू असताना 7व्या ओव्हरमध्ये अक्षर पटेलने फूल लेंथ बॉल टाकला, जो डेव्हिडने बॉलरच्या डोक्यावरून मारला. हा बॉल होबार्ट स्टेडियमच्या छतावर गेला. टीम डेव्हिडने मारलेली ही सिक्स तब्बल 129 मीटरची होती. आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या इतिहासातला हा सगळ्यात लांब सिक्स आहे. याआधी मेलबर्न टी-20 मध्ये ऑस्ट्रेलियन कर्णधार मिचेल मार्शने 124 मीटर लांब सिक्स मारला होता, पण आता टीम डेव्हिड त्याच्याही पुढे गेला आहे.
advertisement
advertisement
Tim David hammered a 129M six. pic.twitter.com/KFYF2DaTAr
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) November 2, 2025
टीम डेव्हिडचं वादळी अर्धशतक
टीम डेव्हिड फक्त या सिक्सवर थांबला नाही, तर त्याने पुढच्या ओव्हरमध्ये शिवम दुबेची धुलाई केली. दुबेच्या ओव्हरमध्ये त्याने तीन फोर मारले आणि फक्त 23 बॉलमध्ये अर्धशतक पूर्ण केलं, पण नंतर दुबेनेच टीम डेव्हिडची विकेट घेतली.
advertisement
डेव्हिडच्या 100 सिक्स
टीम डेव्हिडने त्याच्या या खेळीमध्ये स्वत:च्या नावावर मोठं रेकॉर्ड केलं आहे. डेव्हिडच्या नावावर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 100 सिक्स पूर्ण झाल्या आहेत. टीम डेव्हिड सगळ्यात कमी बॉलमध्ये 100 सिक्स पूर्ण करणारा ऑस्ट्रेलियन खेळाडू बनला आहे. डेव्हिडने 931 बॉलमध्ये 100 सिक्स मारले. वेस्ट इंडिजच्या एव्हिन लुईसनंतर टीम डेव्हिड सगळ्यात जलद 100 सिक्स पूर्ण करणारा दुसरा खेळाडू बनला आहे. एव्हिन लुईसने 789 बॉलमध्ये 100 टी-20 सिक्स मारले होते.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
November 02, 2025 6:57 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
Tim David Six : क्रिकेट इतिहासातला सगळ्यात लांब सिक्स, बापूच्या बॉलिंगवर टीम डेव्हिडचा विश्वविक्रम, Video


